मुख्यमंत्र्यांची सभा, धुळ्य़ाच्या महापौरांसह 38 जणांना नोटीस
By admin | Published: May 16, 2017 05:16 PM2017-05-16T17:16:18+5:302017-05-16T17:16:18+5:30
कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विविध राजकीय पक्षांच्या 38 जणांना
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 16- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, 17 मे रोजी धुळे जिल्ह्याच्या दौ:यावर येत आह़े शिंदखेडय़ातील कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी पांझरा नदीपात्रात त्यांची सभा होणार आह़े सभा शांततेत व्हावी, कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विविध राजकीय पक्षांच्या 38 जणांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 प्रमाणे नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत़
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौ:याबाबत राष्ट्रवादीकडून सभा उधळण्याचा इशारा देण्यात आला आह़े त्यावरून चार दिवसांपासून आमदार आणि राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी होत आह़े या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी 11, कॉँग्रेसचे सहा, युवक कॉँग्रेसचे सात व समाजवादी पार्टीच्या तीन जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
त्यात राष्ट्रवादीच्या महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, जिल्हाप्रमुख संदीप बेडसे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी नगरसवेक संजय वाल्हे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, महानगरप्रमुख सतिष महाले, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करनकाळ, शिव आरोग्य प्रदेशाध्यक्षा डॉ़ माधुरी बाफना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ व समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमिन पटेल, जमील मन्सुरी, अकील अन्सारी यांचा प्रामुख्याने समावेश आह़े
हे लोकशाहीला घातक
विरोधकांना अशाप्रकारे नोटीस देणे हे लोकशाहीला घातक आह़े मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे म्हणणे ऐकून घेणे व त्यावर निर्णय देणे आवश्यक आह़े मात्र नोटीस देणे चुकीचे आह़े असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी सांगितल़े
मुख्यमंत्री कुणाची खाजगी मालमत्ता नाही
मुख्यमंत्री हे कुणाची खाजगी मालमत्ता नाही, असा मुद्दा माजी आमदार शरद पाटील यांनी उपस्थित केला आहे.