धुळे जिल्ह्यातील ४५ प्राथमिक शिक्षकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:37 PM2018-06-13T18:37:39+5:302018-06-13T18:37:39+5:30
बदलीप्रकरण : शिक्षकांना ७ दिवसात उत्तर द्यावे लागणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : बदलीसाठी खोटी माहिती भरणाºया जिल्हा परिषदेच्या ४५ शिक्षकांना बुधवारी नोटीस देण्यात आलेल्या आहे. या शिक्षकांना सात दिवसाच्या आत नोटीसींना उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या १ हजार २५३ प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच आॅनलाइन बदल्या झाल्या. मात्र यात १०५ शिक्षकांना बदली होऊनही शाळा मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळे ते विस्थापित झाले होते. दरम्यान संवर्ग १ व २ मध्ये काही प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याची तक्रार जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित शिक्षकांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना चारही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या होत्या. ४ जून १८ रोजी सीईओंना अहवाल सादर करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील ४७ शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याचे निदर्शनास आले होते. खोटी माहिती भरणाºया शिक्षकांच्या नावाच्या याद्याही जिल्हा परिषदेत प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. खोटी माहिती भरणाºयांमध्ये धुळे तालुक्यातील शिक्षकांची संख्या सर्वाधिक होती.
तब्बल दहा दिवसांनंतर खोटी माहिती भरणाºया शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे बुधवारपासून नोटीसी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ४७ पैकी दोन शिक्षकांनी बदलीसंदर्भात पुरावे सादर केलेले आहेत. त्यामुळे ४५ शिक्षकांनाच नोटीस बजावण्यात आली आहे. या शिक्षकांना आपले म्हणणे सात दिवसात सादर करायचे आहे. त्यानंतरच या शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.