अग्निशमन विभागाच्या नऊ कर्मचा:यांना नोटीस
By admin | Published: February 5, 2017 12:24 AM2017-02-05T00:24:11+5:302017-02-05T00:24:11+5:30
महापालिका : आग लागल्याने नागरिकाने स्वत: चालवून नेला होता बंब
धुळे : शहरातील रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर परिसरातील एका नागरिकाने मनपा अग्निशमन विभागातून अग्निशमन बंब स्वत: चालवत घटनास्थळी नेला होता़ दरम्यान, याप्रकरणी अग्निशमन विभागातील नऊ कर्मचा:यांना नोटीस बजाविण्यात आली आह़े
शहरातील रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने सात ते आठ घरे जळून खाक झाली होती़ सदर आग लागल्याचे कळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच मनपा अग्निशमन विभागाचे तीन बंब तत्काळ घटनास्थळी रवाना झाले होते, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली़ त्यावेळी कामावर असलेले कर्मचारी संबंधित बंबांसोबत घटनास्थळी गेल्याने अग्निशमन विभागात केवळ एक ते दोन जण उपस्थित होत़े त्यामुळे नागरिकांनी गैरसमज करून घेत एक बंब स्वत: चालवून घटनास्थळी आणला़ परंतु त्या बंबाची आवश्यकता भासली नाही, असे अग्निशमन विभागाचे म्हणणे होत़े तर दुसरीकडे रमजान बाबा परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाने दखल न घेतल्याने बंब स्वत: चालवून नेण्याची वेळ आल्याचे सांगितले होत़े सदर घटना गांभीर्याने घेऊन मनपा प्रशासनाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होत़े त्यानुसार अग्निशमन विभागाकडून घटनेची सखोल माहिती मागविण्यात आली होती़ दरम्यान याप्रकरणी नऊ जणांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत़
101 ची समस्या गंभीर
आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्यासाठी 101 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आह़े मात्र हा क्रमांक अग्निशमन विभागासाठी डोकेदुखी होऊन बसला आह़े या क्रमांकावर नको ती संभाषणे करणारे ‘फेक कॉल्स’ सातत्याने येतात़ शिवाय आग लागल्याची माहिती देणारे खोटे कॉल्स येत असल्याने अनेकदा अग्निशमन विभागाची फसगतही झाली आह़े