आता मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरणे शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 12:19 AM2017-02-22T00:19:23+5:302017-02-22T00:19:23+5:30

मनपा : प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, लवकरच अंमलबजावणी होणार सुरू

Now you can fill out the property tax 'online'! | आता मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरणे शक्य!

आता मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरणे शक्य!

Next

धुळे : महापालिकेने क्रेडिट, डेबिट, एटीएम कार्डद्वारे कर स्वीकारण्यास प्रारंभ केल्यानंतर 18 दिवस उलटले असताना मनपा प्रशासनाने कर भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे मंगळवारी जाहीर केल़े प्रशासकीय तयारी पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसात अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे आयुक्त संगीता धायगुडे, सहायक आयुक्त अभिजित कदम यांनी स्पष्ट केल़े
महापालिका प्रशासनाने 2 फेब्रुवारीपासून वसुली विभागात सुरू असलेली चलन पद्धत पूर्णपणे बंद केली आह़े त्यामुळे मालमत्ता कराचे बिल थेट बँकेत भरणे शक्य झाले आह़े मालमत्ता कर भरण्यासाठी 10 पीओएस मशीन्स वसुली विभागाला उपलब्ध करून दिले असून त्याद्वारे मालमत्ताधारकांना आपले एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे कर भरणे शक्य होत आह़े सदर मशीन्सपैकी काही मशीन्स वसुली विभागात ठेवले जाणार असून उर्वरित मशीन्स घेऊन मनपाचे कर्मचारी आपापल्या भागातील नागरिकांकडून घरोघरी जाऊन कर भरून घेत आहेत़ पीओएस मशीन्सद्वारे कर भरल्यास पावती मिळणार असली तरी मूळ पावती वसुली विभागात एक दिवसानंतर उपलब्ध होत असून ई-मेल असलेल्या मालमत्ताधारकांना मूळ पावती ई-मेल वर दिली जाणार आह़े
दरम्यान, डेबिट, क्रेडिट कार्डच्या सुविधेनंतर मनपा प्रशासनाने ऑनलाइन कर स्वीकारण्याची तयारी केली आह़े त्यासाठी मालमत्ताधारकांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली असून केवळ मालमत्ता क्रमांक टाकून स्वत:च्या मालमत्ता कराची पावती मालमत्ताधारकाला ऑनलाइन शोधता येईल़ त्यानंतर लागलीच क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंटदेखील करता येणार आह़े
सदर सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक होत़े त्यामुळे मालमत्ताधारकांकडूनदेखील तशी मागणी सातत्याने होत होती़ ऑनलाइन कर भरणे शक्य झाल्यास धुळ्यात मालमत्ता असलेल्या, मात्र सध्या बाहेरगावी राहत असलेल्या नागरिकांनादेखील मालमत्ता कराचा भरणा ऑनलाइन करता येणार आह़े त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाला आह़े त्यानुषंगाने सदरची सुविधा उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी सुरू असून लवकरच अंमलबजावणी होणार  आह़े

Web Title: Now you can fill out the property tax 'online'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.