बाधीतांची रुग्णांची संख्या तीन हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:11 PM2020-07-30T22:11:36+5:302020-07-30T22:12:19+5:30
शिरपूर : पंचायत समिती तीन आॅगस्टपर्यंत बंद, कर्मचारी निघाला पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी आणखी ५८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३ हजारावर पोहोचली आहे. आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३ हजार ५१ झाली आहे. तसेच बुधवारी रात्री दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०५ झाली आहे.
गुरुवारी जिल्हा रुग्णालय धुळे येथे केलेल्या अँटीजेन टेस्ट च्या ८५ अहवालांपैकी १० अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात धुळे तालुक्यातील सोनगीर येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. तसेच फागणे येथील एक, निकुंभे येथील एक व धुळे शहरातील दोन रुग्णांचा त्यात समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८३ अहवालांपैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात धुळे शहरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच खासगी प्रयोगशाळेतील ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णालयात गुरुवारी केलेल्या अँटीजन टेस्टच्या ८५ अहवालापैकी १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सोनगीर ३, फागणे एक, धुळे २ आणि निकुंभे येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
दोन जणांचा मृत्यू - दरम्यान, हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी दोन जणांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यात धुळे शहरातील सुपडू अप्पा कॉलनी येथील ७२ वर्षीय महिला व धुळे तालुक्यातील अंबोडा येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०५ वर पोहोचली आहे.
शिरपूर पंचायत समितीत शिरकाव
शिरपूर पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी सकाळपासून फवारणीचे काम सुरु झाले आहे. दोन दिवस फवारणी करण्यात येणार आहे.