जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:26 PM2020-09-02T22:26:37+5:302020-09-02T22:29:11+5:30

चार रूग्णांचा मृत्यू झाला.

The number of patients in the district is 9000 and 133 are positive | जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९ हजार पार

dhule

Next

धुळे : जिल्ह्यातील आणखी ११३ रूग्णांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ९ हजारावर पोहोचली आहे. तसेच चार रूग्णांचा मृत्यू झाला.
बुधवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ६७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यत धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ९०१३ इतकी झाली आहे. त्यात जिल्हा रुग्णालय धुळे येथील २४६ अहवालांपैकी ४३ अहवाल धुळे - जिल्ह्यातील आणखी ११३ रूग्णांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. तसेच चार रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमंध्ये धुळे शहरातील देवपूर परिसरातील ५६ आणि ६५ वर्षाचे दोन पुरुष आणि ८२ वर्षाची भावसार कॉलनीतील महिलेचा मृत्यू झाला. तर शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील ६० वर्षाची महिला तर साक्री तालुक्यातील गोराडे येथील ७२ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी जिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरवर २४६ पैकी ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात रामचंद्र नगर १, वाडीभोकर १, धनाई पुनाई कॉलनी २, जुने धुळे १, वरखेडी १, भगवतीनगर १, राजसारथी कॉलनी गोंदूर रोड ३, श्रीराम कॉलनी १, मोहाडी १, उमरगा शिंदखेडा १, पिंपळनेर १, शिवशक्ती कॉलनी चितोड रोड २, परसुळे शिंदखेडा १, बाबरे १,गल्ली नंबर दोन १, धुळे इतर १, पद्मनाभ नगर १, सुभाष नगर जुने धुळे १, शिरुड १, चिचखेडा २, तेली गल्ली १, नागसेन नगर १, चाळीसगाव रोड १, शिवतारानगर साक्री रोड २, प्रमोद नगर सेक्टर नंबर दोन १, फागणे १, कापडणे १, पिळोदा शिरपुर १, सोनगीर १, कुंडाणे वरखेडी २, मिशन कंपाउंड १, आर्वी १, अंचाळ तांडा १, ५०० क्वॉर्टर १, कुसुंबा १, साक्री रोड १ रुग्ण आढळला.
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १०४ अहवालांपैकी २० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात नारायण नगर १, पित्रेश्वर कॉलनी २, वरवाडे १, मयूर कॉलनी १, गुजराती गल्ली १, रसिकलाल नगर १, शिरपूर इतर ३, गरताड १, शिंगावे १, करवंद १, भाटपुरा ३, टेकवाडे १,अर्थे २, नरडाणा १ रुग्ण आढळला
भाडणे साक्री कोविड सेंटर मधील २६ अहवालांपैकी पिंपळनेर नाना चौक १ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ७२ अहवालांपैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात स्नेहनगर १, श्रीनाथ नगर ५, सर्वोदय कॉलनी १, गुलमोहर कॉलनी १, इंद्रप्रस्थ नगर १, वडजाई रोड १, सत्यसाईबाबा नगर १, सुभाष नगर १, सुदर्शन कॉलनी २, मधुकर भगवान नगर १, गवळे नगर १, जगदंबा सोसायटी १, प्रमोद नगर १ आणि
जुने धुळे परिसरात १ रुग्ण आढळला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१ अहवालांपैकी ३ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शिरपूर १, धुळे १ आणि मुकटी येथे एक रुग्ण आढळून आला.
खाजगी लॅब मधील ७१ अहवालापैकी २७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात माधव कॉलनी १, चितोड रोड १, मोहाडी १, अनमोल नगर ३, जे बी रोड १, मालेगाव रोड १, स्वामी नारायण सोसायटी १, लोकरे नगर १, गुरुनानक सोसायटी २, नोमानी क्लिनिक १, स्नेहनगर १, गणेश नगर २, मयुर कॉलनी १, मयुर नगर १, सुभाष नगर १, भिडे बाग १, वेल्हाणे ३, वालखेडा १, भिरडाणे १, कळमसरे १, बोधगाव धामणगाव १ रुग्ण आढळला.

Web Title: The number of patients in the district is 9000 and 133 are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे