धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:54 PM2020-07-27T20:54:45+5:302020-07-27T20:55:25+5:30
शिरपूर येथील माजी आमदारांच्या पत्नीचा मृत्यू
धुळे : जिल्ह्यात सोमवारी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. एकूण १०० रुग्ण आतापर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडले आहे. दरम्यान, सोमवारी आणखी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २७२७ वर पोहोचली आहे. तर १ हजार ७७४ रुग्ण पूर्ण बरे झाले आहे.
जिल्ह्यात सोमवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात धुळे तालुक्यातील लामकानी ,वेल्हाणे व जुने धुळे येथील पुरूषाचा हिरे महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शिरपूर येथील माजी आमदाराच्या पत्नीचे कोरोनाने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. त्यांच्या मुलाचे कोरोनाने नाशिक येथे निधन झाले होते. जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १०० झाली आहे.
सोमवारी जिल्ह्यातील आणखी २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. धुळे त्यात धुळे शहरातील चार आणि धुळे तालुक्यातील २३ रुग्णांचा समावेश आहे.