बँकेत रांगेत नंबर लावण्यावरून तरुणाला बेदम मारहाण
By admin | Published: April 28, 2017 01:03 AM2017-04-28T01:03:32+5:302017-04-28T01:03:32+5:30
अवधान येथील घटना : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : बँकेत रांगेत नंबर लावण्यावरून एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल़े ही घटना सोमवारी दुपारी तालुक्यातील अवधान येथील एस़बी़आय. बँकेच्या शाखेजवळ घडली़ याप्रकरणी चौघांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
कृष्णा प्रल्हाद पारखे (रा़ म्हाडा वस्ती, दंडेवालाबाबानगर, मोहाडी) असे जखमी तरुणाचे नाव आह़े तो सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अवधान येथील एस़बी़आय. बँक शाखेत पैसे भरण्यासाठी गेला होता़ तेथे रांगेत उभे असताना नंबर लावण्यावरून व माङयाजवळ जास्त पैसे आहेत, असे त्याने सांगितल़े या कारणावरून प्रीतेश वाघ, शुभम वाघ, दत्तू मराठे व सावकारे (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा़अवधान या चौघांनी तरुणाला हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ याप्रकरणी कृष्णा पारखे याने मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामराजे करीत आहेत़
घोडदे येथे एकास मारहाण
पत्नीकडे जेवण मागत असताना जेवण बनविले नाही, या कारणावरून समाधान बापू सतोळे (रा़ घोडदे, ता़ साक्री) यांना राधाबाई समाधान सताळे, आनंद राजाराम माळी, चिल्या भिकन माळी, भु:या आनंद माळी व भिल्या भिकन माळी (सर्व रा़ घोडदे) यांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली़, तसेच शिवीगाळ करून धमकी दिली़ ही घटना 14 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी समाधान सतोळे यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम 325, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. पाटील करीत आहेत़
रॉकेल प्राशन केल्याने बालकाचा मृत्यू
धुळे शहरातील वडजाई रोडवरील शहादत्तनगरात राहणारा मुन्ना शहा रफिक शहा (वय 7) या बालकाने मतिमंद अवस्थेत मंगळवारी रात्री 11़ 45 वाजेच्या सुमारास रॉकेल प्राशन केल़े त्रास होऊ लागल्याने त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल़े तेथे डॉ़ दीपाली वाडेकर यांनी तपासणी करून बालकाना मृत घोषित केल़े
याबाबत पो़कॉ.सुरेश पाटील यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े