परिचारिकेवर फौजदाराकडून अत्याचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 12:26 AM2017-01-18T00:26:46+5:302017-01-18T00:26:46+5:30
गुन्हा दाखल : उपनिरीक्षकाच्या पत्नीसह सात जण आरोपी
नंदुरबार : अहमदनगर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने लगAाच्या भूलथापा देत पत्नीच्या मैत्रिणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े परिचारिका असलेल्या पीडितेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पुंडलिक धोंडीराम पावशे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
2015 मध्ये पुंडलिकची ओळख पीडितेशी झाली होती़ त्यानंतर पुंडलिकने तिला लगAाच्या भूलथापा देत व पोलीस असल्याचा धाक दाखवून जून 2015 ते जानेवारी 2017 या काळात तिच्यावर शिर्डी, संगमनेर व अहमदनगर येथे नेऊन अत्याचार केला़ पीडित युवती नंदुरबारच्या रनाळे आणि नंदुरबार रुग्णालयात कार्यरत असताना हा प्रकार घडला. युवतीने लगAासाठी तगादा लावल्यानंतर पावशेने तिला नकार देत जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार औरंगाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
गुन्हा वर्ग : औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तेथून तो नंदुरबार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आह़े
असे आहेत आरोपी : उपनिरीक्षक पावशे व त्याची पत्नी, सासरे भास्कर कदम, विमल कदम, स्वाती कदम, सीमा कदम, दिलीप गवळ (सर्व रा़ नाशिक).