ओबीसींनी आर्थिकदृष्ट्या जागृत होणे गरजेचे - श्रावण देवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:36 AM2018-03-12T03:36:57+5:302018-03-12T03:36:57+5:30
ओबीसींमधील कष्टकरी वर्ग राज्याची सरकारी तिजोरी भरत असताना राज्यकर्ते मात्र लूट करीत आहेत़ त्यामुळे ओबीसींनी आर्थिकदृष्ट्या जागृत होणे गरजेचे आहे, असे मत ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद, नवी दिल्लीचे निमंत्रक प्रा़ श्रावण देवरे यांनी व्यक्त केले़
धुळे - ओबीसींमधील कष्टकरी वर्ग राज्याची सरकारी तिजोरी भरत असताना राज्यकर्ते मात्र लूट करीत आहेत़ त्यामुळे ओबीसींनी आर्थिकदृष्ट्या जागृत होणे गरजेचे आहे, असे मत ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद, नवी दिल्लीचे निमंत्रक प्रा़ श्रावण देवरे यांनी व्यक्त केले़
राज्यातील पहिली राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद येथे झाली़ देवरे म्हणाले की, देशात ओबीसींची लोकसंख्या सद्यस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे़ त्यामुळे ओबीसींची जनगणना झाल्यास सरकारी तिजोरीतील ५० टक्के खर्च ओबीसींवर करावा
लागेल़ ओबीसींची ताकद सरकार जाणून आहे पण दुर्दैवाने ओबीसींनाच ती कळत नाही़ ओबीसींनी आता जागृत झाले पाहिजे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना प्रचारादरम्यान आपण ओबीसी समाजातून आलो असल्याचे जाहीरपणे सांगावे लागले, हा ओबीसींचा सर्वात मोठा विजय होता, असे देवरे म्हणाले.