मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:53 AM2019-07-19T11:53:21+5:302019-07-19T11:53:52+5:30

कृषी अधिकाºयांकडून पाहणी : शिरपूर, पिंपळनेर परिसरात प्रभाव, सूचविल्या उपाययोजना

Occurrence of military creeps on maize crops | मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

मका पिकावर पडलेली लष्करी अळीची पाहणी करतांना तालुका कृषी अधिकारी आऱजी़पाडवी़

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर/पिंपळनेर : मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांचे मका पिक वाचवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करुन उपाययोजनांबाबत परिपत्रक वाटप केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शेतकºयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन तसेच औषधांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यासह पिंपळनेर परिसरात या लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे.
पिंपळनेर
मका पिकावर लष्करी अळी असल्याने या संदर्भात आठ दिवसांपूर्वी उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी पाहणी केली होती. पण जून महिन्यात पेरणी केलेल्या मका पिकात आताही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांनी लष्करी अळीवर मात करण्यासाठी पत्रक वाटप केले असून दिलेले औषध फवारुन पिक वाचविण्यासाठी व अळीचा नायनाट करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुधीर गावीत यांनी केले.
गावीत हे पिंपळनेर, देशशिरवाडे, बल्हाणे, डांगशिरवाडे, सुकापूर या भागात मका पिकावरील लष्करी अळीने प्रादुर्भाव झाला आहे त्यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करीत असून पिक वाचविण्यासाठी पत्रकात दिलेले औषध वापर करावा, असे आवाहन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी एम.जे. नहिरे, कृषी सहाय्यक सर्जेराव अकलाडे, राहूल पाटील, चेतन भामरे उपस्थित होते. 
अमेरीकन लष्करी अळी एका रात्रीतून १०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करु शकतात. मादी पतंग तिच्या जीवनक्रमात सुमारे १ ते २ हजार अंडी घालू शकते, अंडी अवस्था सुमारे दोन ते तीन दिवसांची असते. अवस्था १५ ते २० दिवसात सहा वेळा कात टाकून पूर्ण होते. पूर्णवाढ झालेली अळी २ ते ८ सेंटीमीटर खोलीवर जमिनीत जाऊन आवरण करते.
शिरपूर
शिरपूर : तालुक्यातील उंटावद परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव झाल्याची बातमी झळकताच तालुका कृषी अधिकाºयांनी प्रत्यक्ष क्षेत्र पहाणी करून मार्गदर्शन केले़
उंटावद येथील शेतकरी जितेंद्र भानुदास पाटील यांच्या शेतातील मका पिकावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी आऱजी़ पाडवी यांनी लगेच दखल घेत पाहणी केली़ उन्नत शेती समृध्द शेतकरी योजने अंतर्गत तालुक्यात खरीप हंगाम पूर्व गाव निहाय कृषी विभागाच्या विविध योजना व तालुक्यातील मुख्य पिके कापूस, मका, ऊस, सोयाबीन या पिकावरील कीड, रोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत विविध पिकांवरील कीड रोग व नियंत्रणची माहिती कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून देण्यात आली़
तालुका कृषी अधिकारी आऱजी़पाडवी यांनी मका पिकावरील लष्करी अळीची पाहणी केली़ त्यावेळेस पाडवी यांनी कीड रोगांची निरीक्षणे मोबाईलद्वारे भरण्याच्या सूचना केल्यात़ गावातील मुख्य पिकाची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात येणे करीता मका, कापूस, सोयाबीन आदी पिकांच्या शेतात काम गंध सापळे लावून नियंत्रण करण्यास मदत होते़ 
कृषी मंडळ अधिकारी आऱडी़मोरे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती, लागणारी कागदपत्रे ७/१२ उतारा, ८ अ खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व पिक पेरणी केल्याचे स्वयं घोषणापत्र घेवून शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचा पिक विमा हप्ता २४ जुलैपर्यंत जवळच्या ई-सेवा केंद्र अथवा संबंधित बँकमध्ये जावून भरणा करण्याचे आवाहन केले़ यावेळी अजिंक्य शिवाजी महाजन, सखाराम शंकर महाजन, अशोक सुकलाल चौधरी, डी़बी़गिरासे, डी़ई़महाले आदी उपस्थित होते़

Web Title: Occurrence of military creeps on maize crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे