अधिकारी,कर्मचाºयांसाठीही ‘केआरए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 10:58 AM2017-08-03T10:58:28+5:302017-08-03T11:01:40+5:30

जिल्हा प्रशासन : चांगले काम असेल तरच सत्कार होणार; शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

officer, employes kra | अधिकारी,कर्मचाºयांसाठीही ‘केआरए’

अधिकारी,कर्मचाºयांसाठीही ‘केआरए’

Next
ठळक मुद्देअहवाल १०० गुणांचा  सत्कारासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाला एकूण १०० गुण देण्यात आले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी हा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत यासंदर्भात आढावा घेण्यात येऊन उत्कृष्ट कामाहिती व तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात वापर असावा  उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारून यांना ठरवून दिलेल्या निकषात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व अधिकारी व कर्मचाºयांना माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक असून ते या ज्ञानाचा उउल्लेखनीय कामगिरीची घेतली जाणार दखल  दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त उल्लेखनीय अधिकारी व कर्मचाºयांनी उल्लेखनीय कामगिरी केली असेल, तर त्यांना ते त्यांच्या अहवालात नमूद करावे लागणार आहे. त्याची दखलही घेतली जाणार आहे. प्रमुख निकषांवर दृष्टिक्षेप :  *उपजिल्हाधिकारींना हाताळत असलेल्या कामकाजाबाबत नियम, कायदे, शासनाचे परिपत्रक याविषयी माहिती पाहिजे. पाणी टंचाई व नैसर्गिक आपत्तीच्या काळात उत्कृष्ट काम, शासकीय जमिनींवरील अतिक्रमण काढण्याची कामगिरी.  *तहसीलदारांनी सर्व गावां

 

आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी अधिकारी व कर्मचाºयांना ठरवून दिलेल्या  निकषांचा अहवाल अर्थात ‘केआरए’ आस्थापना विभागाकडे शुक्रवारपर्यंत सादर करावा लागणार आहे. त्यानंतर चांगले काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे केला जाणार आहे. 
याबाबत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांना पत्र पाठविण्यात आले असून त्यांना त्यांच्या कामाचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावा लागणार आहे. 

 


तलाठीला मुख्यालयी राहण्याची अट 
तलाठींना ठरवून दिलेल्या निकषात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तलाठी हे मुख्यालयी राहणे गरजेचे आहे, अशी अट देण्यात आली आहे. तसेच महाराष्टÑ जमिन महसूल नियम पुस्तिकेच्या खंड ४, प्रकरण २ मध्ये विहित केलेली तलाठ्यांची कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडणे आवश्यक आहे. वसुलीचे लक्ष पूर्ण केलेले असावे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कामे तत्परतेने केलेली असावीत. त्यांच्या सजातील सर्व गावांचे सातबारा संगणकीकृत झालेले असावे, असे निकष ठरवून देण्यात आले आहेत. 

 

Web Title: officer, employes kra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.