अधिकारी, कर्मचाऱ्यांची लेखणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 09:59 PM2020-07-29T21:59:00+5:302020-07-29T21:59:18+5:30
पंचायत समिती : सोपान पाटीलच्या धिंगाण्याचे दुसºया दिवशी उमटले तीव्र पडसाद
धुळे : तालुक्यातील सडगाव गणातील पंचायत समिती सदस्याच्या मद्यधूंद पतीने मंगळवारी घातलेल्या धिंगाण्याचे दुसºया दिवशी पंचायत समितीमध्ये तीव्र पडसाद उमटले़ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करीत निदर्शने केली़
धुळे पंचायत समितीमध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व विभागप्रमुखांसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांची बैठक झाली़ या बैठकीला गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे उपस्थित होते़ या बैठकीत पंचायत समिती सभापती विजय पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती रामकृष्ण खलाणे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य देखील सहभागी झाले़
या बैठकीत मंगळवारच्या घटनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली़ त्यानंतर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच या घटनेची माहिती पक्षश्रेष्ठींना देवून पक्षांतर्गत कारवाई करण्याबाबत शिफारस केली जाईल, असे आश्वासन पदाधिकाºयांनी अधिकारी आणि कर्मचाºयांना दिले़ संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशिर कारवाई करावी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा भावना रामकृष्ण खलाणे यांनी गट विकास अधिकाºयांकडे व्यक्त केल्या़
बैठकीनंतर सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांनी पंचायत समितीच्या आवारात तीव्र स्वरुपाची निदर्शन केली़ तसेच याप्रकरणी कायदेशिर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांनी गट विकास अधिकाºयांना दिले़
याबाबत अधिकारी, कर्मचाºयांनी गट विकास अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात मंगळवारी घडलेल्या या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे़ सडगाव गणाच्या पंचायत समिती सदस्या सुनिता पाटील यांचे पती सोपान पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या इतर इसमांनी दारुच्या नशेत २८ जुलै रोजी सायंकाळी ५.४० वाजता गट विकास अधिकारी यांच्या दालनात अरेरावीची एकेरी भाषा वापरुन अर्वाच्च शिवीगाळ केली़ मारण्यासाठी अंगावर धावून जाणे, खुर्च्या उचलून उगारणे, जिवे मारण्याची धमकी देणे अशा पध्दतीने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला़ पंचायत समितीच्या सभापतींना देखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली़ उपस्थित कर्मचाºयांनी त्यांना तीन ते चार वेळा दालनाच्या बाहेर आणून समजावण्याचा प्रयत्न केला़ परंतु कर्मचाºयांना देखील शिवीगाळ केली़ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़ एक ते दिड तास धिंगाणा करुन दहशत माजविल्याने अधिकारी, कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली़ त्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला़
कोरोना संसर्गाच्या काळात देखील अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची कामे अविरतपणे करीत आहेत़ अशा परिस्थितीत या घटना घडत असल्याने मानसिक खच्चीकरण होत आहे़ या घटनांना आळा बसावा यासाठी पंचायत समितीमधील सर्व मंत्रालयीन व तांत्रिक कर्मचारी एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन करीत आहोत़ आमच्या भावना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, संबंधितावर कठोर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
गुन्हा दाखल करण्यासाठी संपर्क
४पंचायत समिती सदस्यांचे पती सोपान पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी देवपूर पोलिसांशी संपर्क केला आहे़
४या घटनेबाबत पोलिसांना तोंडी, तसेच लेखी माहिती देण्यात आली आहे़ शिवाय जिल्हाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देखील माहिती दिली आहे़
४फिर्याद देण्यासाठी पोलिसांशी संपर्क केला असून पोलीस निरीक्षकांनी बोलावल्यावर फिर्याद दाखल करण्यासाठी जाणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकाºयांनी दिली़