मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाईसाठी अधिकारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:59+5:302021-02-26T04:49:59+5:30

शिरपूर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने मास्क वापरणे अनिवार्य केले असून, न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली ...

Officers on the streets to take action against those who do not wear masks | मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाईसाठी अधिकारी रस्त्यावर

मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाईसाठी अधिकारी रस्त्यावर

Next

शिरपूर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने मास्क वापरणे अनिवार्य केले असून, न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जात आहे़ गुरुवारी मास्क न वापरता पायी फिरणे, दुचाकी-चारचाकी वाहन चालक असे ११० जणांविरोधात कारवाई करून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़

२५ रोजी प्रांताधिकारी डॅा.विक्रमसिंग बांदल, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, सहायक बीडीओ सुवर्णा पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी शिंदे यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई केली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या शहरातदेखील पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते या भीतीने आधीच प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे़ शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड देण्यात येत आहे़ नगरपालिका व महसूल विभागाचे पथकाची याकामी नियुक्ती करण्यात आली.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राबवायच्या उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुरुवातीला प्रांताधिकारी डॉ.विक्रमसिंग बांदल यांच्या अध्यक्षतेखाखाली आढावा बैठक झाली. बैठकीनंतर शहरातील पाच कंदील चौक परिसर, आशीर्वाद हॉस्पिटल परिसर, गुजराथी कॉम्प्लेक्समधील परिसरात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. नगरपालिका अतिक्रमण अधिकारी किरण चव्हाण, सहा. लिपिक लक्ष्मण गोपाळ, मुकेश विसपुते, सतीश पाटोळे, प्रकाश गिरासे, बाळू मराठे, इसराज शेख, भरत ईशी यांच्यासह कर्मचारी यांनी विनामास्क धारकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ११० व्यक्तीवर मास्क न वापरल्याबदल दंडात्मक कारवाई करत २ हजार २०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. दरम्यान ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंग बांदल यांनी सांगितले.

साक्री

येथे प्रांताधिकारी भीमराज दराडे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर या अधिकाऱ्यांनीही आज साक्रीत विनामास्क वावरणाऱ्या पादचारी, दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. या अधिकाऱ्यांनी बसस्थानक तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठेत पायी फेरी मारली. यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

पिंपळनेर

येथे विन मास्क धारकांवर महसूल विभाग व पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. कारवाईसाठी अपर तहसीलदार विनायक थवील, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर रस्त्यावर उतरले होते. यावेळी सरपंच देवीदास सोनवणे, ग्रामविकास अधिकारी डी.डी. चौरे व महसूल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बिनामास्कधारकांना पोलिसांनी बसस्थानक परिसरात चोपही दिला.

मालपूर

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचासह आज ग्रामीण भागात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ज्यांच्याकडे दंड भरण्यास पैसे नव्हते अशांना दंडुक्याचा प्रसाद देऊन जागेवरच मास्क लावून जाऊ देण्यात आले. दोंडाईचात छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक आदी तसेच वर्दळीच्या ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. यावेळी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, दोंडाईचा मंडल अधिकारी महेशकुमार शास्त्री, मालपूर सजाचे तलाठी विशाल गारे, राकेश राजपूत आदींनी कारवाई केली.

Web Title: Officers on the streets to take action against those who do not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.