संततधारेने घरांची पडझड, पिकांचे नुकसान, तिघांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 01:07 PM2019-09-29T13:07:54+5:302019-09-29T13:08:25+5:30

धुळे : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे विजा कोसळून दोन बहिणींचा तर पुरात वाहून एकाचा ...

The offspring lost their homes, damaged crops, lost all three lives | संततधारेने घरांची पडझड, पिकांचे नुकसान, तिघांनी गमावला जीव

dhule

Next

धुळे : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे विजा कोसळून दोन बहिणींचा तर पुरात वाहून एकाचा असा तिघांचा बळी गेला. अनेक घरांची पडझड व पुरामुळेही मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या काहींना वाचविण्यात यश आले़ शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तसेच वादळी वाऱ्यांनी आडव्या पडलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असून यंत्रणा मात्र निवडणुकीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र आहे.
पावसाची दमदार हजेरी
विजांच्या कडकडटासह जोरदार पाऊस झाला आहे़ गुरुवारी २४ तासांत १४६ मि.मी. पावसाची नोंद झाली़ शिरपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली़ त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यात एकाचा दिवसात ४३ मि.मी़ पावसाची नोंद झाली़ चार दिवसांच्या संततधार पावसानंतर शनिवारी सकाळी सुर्याचे दर्शन झाले़
धरणांमधून विसर्ग सुरूच
पाऊस जिल्ह्यात सर्वदूर होत असल्यामुळे अमरावती मध्यम प्रकल्प, मालनगाव, लाटीपाडा, जामखेलीसह अक्कलपाडा धरण ओसंडून वाहत आहे़ परिणामी नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ नदी काठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेला आहे़ काही ठिकाणी तर पुन्हा पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली होती़
घरांची झाली पडझड
कुठे अधिक तर कुठे कमी पाऊस असलातरी पावसाची संततधार सुरु असल्यामुळे कच्या व मातीच्या घरांची पडझड झाली़ यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा संसार उघड्यावर आलेला आहे़ सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे़ नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांकडून होत आहे़
वीज पडल्याने मृत्युमुखी
पाऊस दमदार होत असल्यामुळे सोबतच वीज कोसळण्याचे प्रमाण सध्याच्या काळात वाढत आहे़ धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावाच्या शिवारात असलेल्या बोरी नदीच्या जवळ कौशल्या कैलास सोनवणे, छाया देवा सोनवणे, सविता खंडू सोनवणे हे नेहमीप्रमाणे बोरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या़ अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला, पाऊस येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आणि तिघींच्या अंगावर वीज कोसळली़ यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बेशुध्दच पडल्या़ वैद्यकीय उपचार सुरु असताना कौशल्या सोनवणे आणि छाया सोनवणे या दोघींचा मृत्यू झाला़ तर जखमी सविता सोनवणे हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहे़
शेतकरी वाहून गेला
धुळे तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी शरद नथू पाटील (४१) रा.धामणगाव हे खोरदड रस्त्याने शेतातून घरी येत असतांना बोरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडले आणि वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली.
दरम्यान, शेतीसह घरांची पडझड होत असल्यामुळे पंचनामा तातडीने करण्याची मागणी होत आहे़

Web Title: The offspring lost their homes, damaged crops, lost all three lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे