धुळे तालुक्यातील नकाणे गावात दीड लाखांची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 06:11 PM2018-03-28T18:11:28+5:302018-03-28T18:11:28+5:30

चौघांविरूद्ध गुन्हा दाखल, वीज कंपनीच्या कर्मचाºयांची कारवाई

One and a half lakhs of electricity theft in the village of Dhule taluka | धुळे तालुक्यातील नकाणे गावात दीड लाखांची वीज चोरी

धुळे तालुक्यातील नकाणे गावात दीड लाखांची वीज चोरी

Next
ठळक मुद्देघरगुती मीटरमध्ये केली होती हेराफेरीवीज कंपनीच्या कर्मचाºयांनी केली तपासणीकारवाईमुळे खळबळ


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : घरगुती मीटरमध्ये फेरफार करून सुमारे दीड लाखांची वीज  चोरी केल्याप्रकरणी नकाणे येथील चौघांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी नकाणे येथे १४ मार्च रोजी तपासणी मोहीम राबविली. त्यात घरगुती विज मीटरमध्ये फेरफार करून, वीज चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आले.
यात रतन नाफरा पाटील, योगेश रवींद्र पाटील यांनी घरगुती मीटरमध्ये फेरफार करून १० हजार ७५३ रूपये किंमतीची वीज चोरी केली. तर शकुंतलाबाई निंबा पाटील, संतोष निंबा पाटील यांनी आपल्या घरातील मीटरमध्ये फेरफार करून तब्बल १ लाख ४२ हजार २८३ रूपये किंमतीची वीज चोरी केली.
या प्रकरणी वीज मंडळाचे कर्मचारी प्रदीप राधेशाम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला विद्युत अधिनियम २००३चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल बोरसे करीत आहेत.  


 

Web Title: One and a half lakhs of electricity theft in the village of Dhule taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.