हाडाखेड नाक्यावर दीड लाखाचे तांबे जप्त
By admin | Published: July 11, 2017 12:00 AM2017-07-11T00:00:02+5:302017-07-11T00:00:02+5:30
सांगवी पोलीस : बसचालकासह वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल
पळासनेर : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्यावर सोमवारी भल्या पहाटे सांगवी पोलिसांनी खासगी लक्सरी बसमधून 1 लाख 55 हजार 2 रुपयांचे तांबे व इतर धातूसदृश वस्तूंच्या 20 गोण्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बसच्या चालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना धारीवाल या खासगी लक्सरी बस (एमपी 30-पी 0041)मधून तांबे व इतर धातूंची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून खेडकर यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचा:यांनी हाडाखेड नाक्यावर संबंधित बस अडविली.
या बसच्या डिक्कीत पोलिसांना दीड लाख रुपये किमतीची तांब्याची तार व इतर धातूसदृश वस्तू 20 गोण्यांमध्ये भरलेल्या आढळून आल्या.
दोन जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी सांगवी पोलिसांनी खासगी लक्झरी बसचालक इंद्रसिंग शिवनारायण ठाकूर (रा. इंदूर) व वाहक इजाज मोहम्मद व कबीर मोहम्मद (रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून चालक इंद्रसिंग पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहकाला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात ठेवले आहे.