परराज्यातून येणारा एक कोटीचा मुद्देमाल शिरपूरला हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:07 PM2019-09-14T22:07:24+5:302019-09-14T22:07:50+5:30

कंटेनरचालकास अटक : ८५ लाख ५३ हजार २०० रुपये किंमतीचे १८० तंबाखूजन्य पदार्थांचे खोके जप्त

One crore issues from the state were taken to Shirpur | परराज्यातून येणारा एक कोटीचा मुद्देमाल शिरपूरला हस्तगत

परराज्यातून येणारा एक कोटीचा मुद्देमाल शिरपूरला हस्तगत

Next
रपूर : राज्यात पर राज्यातून अवैध सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीसांनर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी कारवाई करुन लाखो रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व कंटेनरसह एकूण १ कोटी ५ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले़ शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यातील शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ राज्यासह बाहेरील राज्यातून अवैध सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची एका कंटेनर मधून तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीवरून शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई-आग्रा महामार्गावरील शहादा फाट्यावर पोलिसांनी सापळा रचला. रात्री ११ वाजेच्या सुमारास आरजे ५२ जीआर ३९६१ या क्रमांकाचा कंटेनर येताच त्याला थांबवून चौकशी करण्यात आली़ चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली़ परिणामी पोलिसांना संशय बळावला़ तसेच त्या चालकाला कंटेनर मधील मालाची योग्य ती माहिती देता येत नसल्याने सदर कंटेनर संशयावरुन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. तपासणी करतांना कंटेनरमध्ये इतर मालाच्या आडोशाला सुगंधीत तंबाखूजन्य व गुटकाजन्य पदार्थाची १८० खोके आढळून आली. सदर मालाची किंमत ८५ लाख ५३ हजार २०० रुपयांचा असून कंटेनर सहित १ कोटी ५ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाला कळविण्यात आले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कंटेनर वरील चालक रमजान नसरुद्दीन (रा़ नसरु ता़ डुंगरपूर जि़ पलवल, हरियाणा) यास संशयावरुन अटक करण्यात आली आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण बा-र्हे, सपकाळ, मोरे, सनी सरदार, संदीप रोकडे आदींनी केली. दरम्यान, हा मुद्देमाल कोठून येत होता, कुठे घेऊन जाणार होता, याची माहिती पोलीस घेत आहेत़ सापळा यशस्वीकंटनेरमधून तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी सापळा लावला आणि तो यशस्वी करुन दाखविला़

Web Title: One crore issues from the state were taken to Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.