इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे एकदिवसीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:39 AM2021-09-26T04:39:28+5:302021-09-26T04:39:28+5:30
धुळे - येथील इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रविवारी एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशभरातील प्रख्यात तज्ज्ञ ...
धुळे - येथील इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रविवारी एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशभरातील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर्स, रुग्णालयाविषयीच्या समस्यांवर संबोधित करणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने राज्यातील डॉक्टर या चर्चसत्रात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आय.एम.ए. राज्याचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे व राज्य कार्यकारिणी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्रात दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेचे कुलसचिव डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. महिला डॉक्टरांचे आरोग्य क्षेत्रातील स्थान या विषयावर डॉ. नीलिमा मिश्रा मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. जयेश लेले :आय.एम.ए.च्या राष्ट्रीय घडामोडी, डॉ. शिवकुमार उत्तुरे : महाराष्ट्र मेडिकल काैन्सिलचे कामकाज, डॉ. अशोक आढाव : आय.एम.ए. चा भुतकाळ, वर्तमान व भविष्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. सुहास पिंगळे, डॉ.प्रकाश देव, डॉ. प्रकाश मराठे, डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. राजीव अग्रवाल, डॉ. मंगेश पाटे, डॉ.संतोष कदम आदी तज्ज्ञांचे व्याख्यान होणार आहे. आय.एम.ए. चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्या आवाहनानुसार आय.एम.ए च्या सदस्यांनी १ लक्ष रुपयांचा निधी गोळा केला असून संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षांकडे निधी सुपूर्द केला जाणार आहे.
चर्चसत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. रवी वानखेडकर, डॉ. राधेशाम रोडा, डॉ. मीनल वानखेडकर, डॉ. मंदार म्हस्कर, डॉ. जयंत देवरे, डॉ.दीपक शेजवळ, डॉ. सचिन ढोले, डॉ.नीता बियाणी, डॉ. नीता हटकर, डॉ. योगेश बोरसे, डॉ. सुरेश वसईकर, डॉ. महेश अहिरराव, डॉ. महेंद्र राजपूत, डॉ. शिल्पा पवार, डॉ. ज्योती तिवारी, डॉ. भाग्यश्री अहिरराव, डॉ. यतिन वाघ हे परिश्रम घेत आहेत.