शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन
By अतुल जोशी | Published: January 30, 2024 05:37 PM2024-01-30T17:37:12+5:302024-01-30T17:37:35+5:30
संमेलनाची सुरुवात गुरुवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून ही ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.
धुळे : शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन १ फेब्रुवारी २४ रोजी होणार आहे. हे संमेलन आय.एम.आय. हॅाल, गरुड वाचनालयाच्याशेजारी धुळे येथे होणार असल्याचे शुभंकरोती मंडळाच्या संस्थापिका सोनाली जगताप यांनी कळविले आहे. संमेलनाच्या अध्यक्षा लता गुठे (मुंबई) असून, संमेलनाचे उद्घाटन पद्मा हुशिंग (ठाणे) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॅा. मधुकर घाणेकर (पुणे) हे असतील.
संमेलनाची सुरुवात गुरुवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून ही ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण, पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. त्यानंतर मनोज वराडे (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुपारच्या सत्रात गझल मुशायरा होईल. गझल मुशायराच्या अध्यक्षस्थानी रवींद्र यशवंतराव देशमुख (मुरबाड) असतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता डॅा. अनुराधा कुळकर्णी यांची पद्मा हुशिंग प्रकट मुलाखत घेणार आहेत. सायंकाळी पाच ते ७ यावेळेत पत्रकार पंकज दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षीय भाषणानंतर संमेलनाची सांगता होणार आहेे. या साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन सोनाली जगताप, माया यावलकर, सुमती पवार, जगदीश देवपूरकर यांनी केले आहे.