दुचाकीसह विहिरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:41 PM2018-01-09T22:41:23+5:302018-01-09T22:41:58+5:30

धुळ्यातील घटना : जवानांनी काढला मृतदेह  

One died due to a dip in well with a bike | दुचाकीसह विहिरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

दुचाकीसह विहिरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देधुळ्यानजिक साक्री रोडवरील एका विहिरीत घडली घटनाविहीरीत पाणी असल्याने दुचाकीसह कौलस्कर पाण्यात बुडालेएसआरपीएफच्या जवानांनी त्यांना दुचाकीसह बाहेर काढले

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दुचाकीसह ४० फूट खोल विहीरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना साक्री रोडवर मंगळवारी दुपारी घडली. एसआरपीएफच्या  जवानांनी त्यांना दुचाकीसह बाहेर काढले़   
 शहरातील साक्री रोडवर मातोश्री वृध्दाश्रम आहे़ या वृध्दाश्रमालगत रस्त्याच्या बाजुला संरक्षण कठडे नसलेली  मोठी ४० फूट खोल विहीर आहे़ विहीरीत ३५ फूट पाणी असून त्यात सात फुट गाळ आहे. या विहिरीत मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास एम.एच.१८ एएफ ४८५७ क्रमांकाची दुचाकी घेऊन जाणारे  रवींद्र सदाशिव कौलस्कर (वय ४०) रा.विकास कॉलनी हे  कोसळले. विहीरीत पाणी असल्याने दुचाकीसह कौलस्कर पाण्यात बुडाले होते.   विहीरीत पडल्याचा आवाज झाल्याने जवळच असलेल्या एका महिलेने विहीरजवळ जाऊन बघितले. तेव्हा विहीरीत कोणीतरी बुडल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच आरडाओरड केली. ते ऐकून  राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ धुळ्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले़    जवानांनी विहीरीत उडी घेऊन  दुचाकीसह कौलस्करांना बाहेर काढले.  परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रतिसाद दलाचे नियंत्रण अधिकारी तथा समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक समादेशक एस़ ई़ पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोरे, चौधरी यांच्यासह डी़ एस़ चौरे, डमाळे, सचिन आव्हाड, पवार, गिरासे, के़ पी़ चौधरी, साळुंखे यांनी मदतकार्य केले. 
  या घटनेबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला होता़ घटनास्थळी धुळे तालुका पोलीस दाखल झाले होते़ 

Web Title: One died due to a dip in well with a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.