मतदानास एक तास उशीरा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:18 PM2019-04-29T23:18:05+5:302019-04-29T23:18:29+5:30

कापडणे येथील प्रकार : ताटकळत उभे रहावे लागल्याने मतदारांमध्ये नाराजी

One hour late start to voting | मतदानास एक तास उशीरा प्रारंभ

मतदानास एक तास उशीरा प्रारंभ

Next

लोकमत आॅनलाईन 
कापडणे : कापडणे येथे मतदान कर्मचाºयांच्या चुकीमुळे मतदान केंद्र क्रमांक ६९ मध्ये तब्बल एक तास उशिराने मतदानास सुरुवात झाली. यामुळे मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले.
कापडणे येथील एच.एस. बोरसे हायस्कूल जुनी इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक-२ येथे मतदान केंद्र क्रमांक ०६/६९ या मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरुवात न होता तब्बल एक तास उशिराने सकाळी आठ वाजता मतदान करण्यास सुरुवात झाली. यामुळे मतदान करण्यासाठी आलेले वयोवृद्ध रुग्ण व अन्य मतदारांची मोठी दमछाक झाली.
कापडणे येथील बोरसे  हायस्कूल मधील केंद्र क्रमांक ६९ मध्ये सकाळी सात वाजेपर्यंत मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाºयांनी मतदानाचे नियंत्रण युनिट सीपी, व्हीव्हीपॅड यंत्र, मतदान युनिट यांची वेळेवर जोडणी न केल्यामुळे अधिकाºयांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. मतदान सुरू करण्यापूर्वी मॉक पोलनुसार ५० अभिरूप मतदान हे मतदान युनिटवर करावे लागत असल्याने हे अभिरूप केलेले मतदान व्हीव्हीपॅड मशीनमध्ये पडत असतात व अन्य सात स्लिप पडत असतात. 
यापैकी शेवटची सातव्या क्रमांकाची स्लीप पडण्यास अडथळा येत होता. मात्र, मॉकपोलद्वारे ५० अभिरुप झालेले मतदान व सात स्लिप ताब्यात घेऊन नियंत्रण युनिटचे क्लोज, बंदचे बटन न दाबता नियंत्रण युनिट मतदान अधिकाºयांनी पेपर सील करून टाकले. शेवटी सदर चूक लक्षात आल्यावर मतदान अधिकारी व वरिष्ठ अधिकाºयांद्वारे नियंत्रण युनिटचे पेपर सील पुन्हा ओपन करून मतदान सुरू करण्यापूर्वी घेण्यात आलेले ५० अभिरूप मतदान अधिक सात स्लिपा व्हीव्हीपॅडमधील अभिरूप स्लिपांच्या मागे स्टॅम्प मारून अधिकाºयांच्या सह्या करण्यात आल्या व नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबून पुढील मतदान प्रक्रिया तब्बल आठ वाजेनंतर सुमारे एक तास उशिराने सुरू करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे येथील केंद्रावरील मतदान अधिकारी व कर्मचाºयांची मोठी धांदल उडाली होती.
सदर मतदान केंद्रावर सकाळी लवकर मतदान करण्यासाठी मतदार आलेले होते. मात्र, सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू न होता. एक तास उशिरा मतदानास सुरुवात झाल्याने उत्साहाने आलेल्या मतदारांमध्ये नंतर नाराजीचे वातावरण दिसून आले. 
रुग्णाचे हाल
दरम्यान,  मतदान करण्यासाठी दवाखान्यातून  आलेली  वयोवृद्ध महिला देखील दुखापत झालेल्या हाताला तसेच धरून ताटकळत उभी होती. मतदान करण्यासाठी उशिरापर्यंत वाट बघावी लागल्याने मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी संबंधित अधिकाºयांविषयी नाराजी व्यक्त केली. 
माहितीचा अभाव, मतदारांचा गोंधळ  
बहुतांश मतदान केंद्रात बॅलेट युनिटला आडोसा म्हणून कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते. त्यावर मतदान कक्ष असा उल्लेख करण्यात आलेला होता. मात्र, त्यावरील महत्त्वाच्या बाबी ठळकपणे उशिरापर्यंतही लिहिण्यात आलेल्या नव्हत्या. त्यात राज्याचे नाव, मतदार संघाचे नाव व क्रमांक, मतदानाची तारीख, मतदान केंद्राचे नाव व क्रमांक यांची ठळक माहिती दर्शनी भागावर दिसून येत नव्हती. त्यामुळे मतदाराला मतदान केंद्राबाबत खात्री पटण्यास विलंब होत होता.

Web Title: One hour late start to voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.