आग्रा महामार्गावर रस्तालुट करण्यासाठी दगडफेक, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार
By admin | Published: April 13, 2017 11:03 AM2017-04-13T11:03:38+5:302017-04-13T11:03:38+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाटय़ावर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रस्तालुट करण्याच्या इराद्याने अज्ञात इसमांनी दगडफेक केली.
Next
धुळे,दि.13- मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाटय़ावर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रस्तालुट करण्याच्या इराद्याने अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार झाल्याची घटना घडली.
मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाटय़ावर रात्री अडीच वाजेच्या सुमारास रस्तालूट करण्याच्या इराद्याने अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यात एम.पी.07 एचबी.3732 या ट्रकवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यात ट्रकच्या पुढे चालणा:या मोटारसायकलला धडक देत ट्रकने सुमारे अर्धा किलोमिटर अंतरार्पयत दुचाकीला फरफटत नेले. यामुळे उडालेल्या ठिणगीतून दुचाकीने पेट घेतला. आगीत दुचाकी व ट्रक जळून खाक झाला. या अपघातात.एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. ट्रक ग्वालेर वरून मुंबईकडे जात होता. या ट्रकद्वारे बटाटय़ाची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत रस्तालुटीच्या उद्देशाने शेतात लपून असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अपघातातील मयत व जखमींचे नावे निष्पन्न करण्याचे काम सुरु होते.