एक लाखाचे सागवान लाकूड जप्त
By admin | Published: January 22, 2017 12:19 AM2017-01-22T00:19:49+5:302017-01-22T00:19:49+5:30
शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावाकडून शिरपूरकडे अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणा:या चालकासह दोन अन्य जणांना शिरपूर वनविभागाच्या अधिका:यांनी शनिवारी रंगेहाथ पकडले आहे.
शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावाकडून शिरपूरकडे अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणा:या चालकासह दोन अन्य जणांना शिरपूर वनविभागाच्या अधिका:यांनी शनिवारी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाचे सहायक वनसंरक्षक ए. आर. जाधव व त्यांच्या पथकाला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. चालक महेंद्र रानू जोशी (रा. सत्रासेन, ता. चोपडा. जि. जळगाव) हा कळमसरे गावाकडून शिरपूरकडे वाहन (एम. एच. 19 वाय 0346) घेऊन येत होता. त्याच वेळी वनविभागाच्या पथकाने त्याची गाडी थांबविली. त्यात पथकाला चालक महेंद्र हा अवैध लाकडाची वाहतूक करत असल्याचे समजले.
चालक महेंद्र याला विचारपूर केली असता, हे लाकूड सत्रासेन येथील लाकूड व्यापारी सुनील नरसिंग पावरा यांच्याकडे नेत असल्याचे त्याने सांगितले. या वाहनात पथकाला वीरसिंग जामसिंग पावरा, दिलवरसिंग लुका पावरा (रा. सर्व सत्रासेन) हे देखील आढळून आले असून या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत 1 लाख रुपयाचे सागवानी लाकूड व वाहन ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या विरोधात वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1), ई. फ. 41 (2) ब, 42 अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील चौकशी वनपाल महेश चव्हाण करीत आहे.