आघाडीचा एक चिन्ह एक पक्ष फॉर्म्युला फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:09 PM2018-12-10T17:09:03+5:302018-12-10T17:09:31+5:30
संघटनअभावी राष्ट्रवादीला अपयश : एमआयएम व सपामुळे आघाडीचे झाले नुकसान
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकापूर्वी भाजपाचे आघाडी पक्षातील विद्यमान माजी, माजी, पदाधिकाºयांना भाजपात पक्षप्रवेश दिला होता़ राष्ट्रवादी पक्षाला निवडणुकापुर्वी संघटन व प्रबळ उमेदवार देता येवू न शकल्याने राष्टÑवादीला अपयशास सामोरे जावे लागले आहे़ तर यंदाच्या निवडणुकीत आघाडी पक्षाने एक चिन्ह एक पक्ष फॉर्म्युला वापरून देखील सत्ता मिळविता आलेली नाही़
आजी, माजी, दिग्गज पराभुत
महापालिकेवर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची पंधरा वर्ष सत्ता होती़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची प्रभागातील वर्चस्व होते़ मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाने देखील प्रबळ उमेदवार प्रभागात दिले होते़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षांतील आजी, माजी, विद्यमान दिग्गज नेत्यांना पराभव सहन करावा लागला आहे़
आघाडी करुनही अपयश
महापालिकेवर पंधरा वर्ष राष्ट्रवादी पक्षाची सत्ता होती़ मात्र निवडणुकीपूर्वी पक्षातुन १५ आजी, माजी, विद्यमान नगरसेवक भाजप पक्षात गेले़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने संघटन वाढविण्यासाठी काँग्रेस पक्षांची युती केली़ विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचे ग्रामीण भागात वर्चस्व फायदा राष्ट्रवादी पक्षाला होणार असल्याने ४ उमेदवार काँग्रेस पक्षाकडे दिले होते़ मात्र आघाडीच्या निर्णयानंतरही राष्ट्रवादी पक्षाला काँगे्रस पक्षाकडून समाधानकारक जागावर यश मिळाले नाही़
भाजपमध्ये गेलेल्यांचा विजय
महापालिका निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी पक्षांतुन भाजपा प्रवेश घेतलेले आजी,माजी, विद्यमान नगरसेवकांनी भाजपाकडून उमेदवारी केली होती़ त्यामुळे त्यांना पुन्हा भाजपाकडून नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे़ मात्र प्रभाग पाच मधीन मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे यांच्या विरोधात भाजपाचे विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे विजयी झाले आहेत़ त्यामुळे भाजपा पाचमध्ये यश मिळविता आलेले नाही़
आघाडीला मुस्लिम प्रभागातही पी हाट
महापालिका निवडणुकीत मुस्लिम प्रभागात एमआयएम आणि समाजवादी पार्टीमुळे राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला यंदा फटका बसला आहे. त्यामुळे येथून आघाडीला कमी जागा मिळाल्या.