वीज पडून एक महिला ठार तर दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:13 PM2019-09-26T13:13:59+5:302019-09-26T13:14:15+5:30
धुळे व शिरपूर : तालुक्यातील सावळीतांडा व बभळाज परिसरातील घटना
धुळे/बभळाज : जिल्ह्यात बुधवारी सकाळी धुळे व शिरपूर तालुक्यात वादळी पाऊस झाला. त्यात धुळे तालुक्यातील सावळी तांडा येथे शेतात वीज कोसळून एक महिला जागीच ठार झाली तर शिरपूर तालुक्यात तरडी शिवारात वीज कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.
पहिल्या घटनेत धुळे तालुक्यातील सावळीतांडा येथील ललिताबाई श्रावण राठोड (३५) या बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना मुसळधार पावसामुळे अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाल्या. त्यांना भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या या अकस्मात जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
तर दुसºया घटनेत शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील शेतकरी विकास गुलाबराव पाटील यांच्या मालकीच्या तरडी शिवारातील शेतात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काम करणारे सालदार निंबा रहेश्या पावरा (३२) व मोहन हरसिंग पावरा (३५) हे दोघे वीज कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपुर येथे दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थीर आहे. सुरवातीला दडी दिलेला पाऊस संपूर्ण धुळे जिल्ह्यासह शिरपूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून जोरदार बरसतो आहे. पावसाने गेल्या दोन दिवसापासून थोडी उसंत घेतलली होती गेल्या आठवडाभर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.
यावर्षी सर्वच भागात समाधान कारक पाऊस झाला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत़ या वर्षी ओला दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती आहे.
पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. त्यात पाऊस थांबल्यावर शेतकरी पिकांच्या मशागतीसाठी शेतशिवाराकडे वळले आहेत. अशातच ऐन शेतकामाचा मोसमात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून विज कोसळण्याचा घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे़
बभळाज येथे तीन बकºया ठार
*याचवेळी बुधवारी दुपारी बभळाज गावाजवळील सातपुड्यातील तिखी बरडी जवळ विज कोसळुन तीन बकºया ठार झाल्या बकºया चारणारा गुराखी अनिल पावरा हे बचावले असून त्यांना विजेची वाफ लागल्याचे समजते.
* थाळनेर परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली पावसा मुळे शेतकºयांचे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
*नरडाणा येथेही मूसळधार पाऊस झाला. येथील शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.