वाळू चोरीप्रकरणी एकास सश्रम कारावास
By admin | Published: July 2, 2017 11:51 AM2017-07-02T11:51:38+5:302017-07-02T11:51:38+5:30
शिंदखेडा पोलिसात होता गुन्हा दाखल. 10 हजारांचाही ठोठावला दंड
Next
ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा,दि.2 - पांझरा नदीपात्रातून वाळूची चोरी करताना सापडलेल्या एकाविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी न्यायालयात कामकाज होऊन आरोप सिद्ध झाल्याने त्याला दोन वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ दंड न भरल्यास 3 महिन्याची शिक्षा ठोठावण्याचे आदेश देण्यात आले.
संदीप रतीलाल पाटील (27) रा़ कंचनपूर ता़ शिंदखेडा हा 29 सप्टेंबर 2014 रोजी शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर ते डोंगरगाव दरम्यान अवैधरित्या कंचनपूर शिवारातील पांझरा नदीपात्रातून वाळूची चोरी करताना आढळला होता़
याप्रकरणी तत्कालीन तलाठी नागराज पाटील यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आऱ एस़ बन्सी, हे.कॉ. वासुदेव जगदाळे आणि पो.ना. दीपक विसपुते यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले. यानंतर साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली होती़
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी आरोपी संदीप पाटील याला दोन वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आह़े दंड न भरल्यास 3 महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.