धुळ्यात कांद्याची आवक घटली, भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:28 AM2019-09-24T11:28:11+5:302019-09-24T11:28:36+5:30

पिंपळनेरला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज

The onion in the dust diminished, prices dropped | धुळ्यात कांद्याची आवक घटली, भाव कडाडले

धुळ्यात कांद्याची आवक घटली, भाव कडाडले

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे/ पिंपळनेर : गेल्या काही दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झालेली आहे. आवक कमी होत असल्याने कांद्याचे दरही गगनानला भिडू लागले आहेत. किरकोळ बाजारात ४५ ते ५० रूपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. अजून भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कांद्याच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रु येवू लागले आहे. दरम्यान पिंपळनेर येथे कांद्याला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
यावर्षी सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा सडला आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक नेहमीपेक्षा खूपच कमी झालेली आहे.
धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजारपेठेत साक्री, पिंपळनेर, शिरपूर, मालेगाव या परिसरातून कांद्याची आवक होत असते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत १२५० क्विंटल कांद्याची आवक झालेली होती. कांद्याला ४१५० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतून मिळाली.
भाव कडाडले
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याची अपेक्षित आवक नसल्याने, त्याचा परिणाम दरावर होवू लागला आहे. यापूर्वी २० ते २५ रूपये किलो दराने विकला जाणाºया कांद्याचे भाव प्रतिकिलो ४५ ते ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. चढ्या दराने कांदा विकला जात असल्याने, ग्राहकांच्या डोळ्यातही अश्रु येवू लागले आहेत.
पिंपळनेर- येथील उपबाजार समितीत सोमवारी ५०० ते एकहजार रुपयांपर्यंत कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
पिंपळनेर उपबाजार समितीमध्ये सोमवारी अंदाजे साडेतीनशे पेक्षाही जास्त वाहनांचा लिलाव करण्यात आला. यात उत्तम प्रतीच्या कांद्याला चार हजार रुपये भाव देऊन सरासरी ३००० ते ३७०० रूपये प्रति क्विंटलपर्यंत भाव व्यापाºयांनी कांद्याला दिले. यामुळे पाच हजार रूपयांपर्यंत पोहोचलेला कांद्याचा दर हा येथील उपबाजार समितीत आज कमी मिळाला. १००० ते १२०० रुपयांपर्यंत भाव कमी मिळाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी निर्माण झाली. येथे व्यापाºयांनी आज अंदाजे सात हजार टन माल खरेदी केला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाचे आगमन झाल्याने या वेळी शेतकºयांसह व्यापाºयांचे लिलावाच्यावेळी हाल झाले. यामुळे शेतकºयांना व्यापाºयांकडून पैस, धनादेश घेताना रात्र झाली होती.

Web Title: The onion in the dust diminished, prices dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे