कांदा ३०० रुपयांनी गडगडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:07 PM2020-08-22T17:07:00+5:302020-08-22T17:07:25+5:30
पिंपळनेर : उपबाजार समितीत २५० वाहनांचा लिलाव, दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत शुक्रवारी कांद्याच्या २५० वाहनांचा लिलाव झाला. यावेळी कांद्याला १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याचे दर पुन्हा कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली. आता दोन दिवस मार्केट बंद राहणार असून सोमवारी मार्केट पुन्हा सुरू होईल.
पिंपळनेर उपबाजार समितीत गुरुवारी लिलावासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहने दाखल झाली होती. लिलावावेळी पाऊस येत असल्याने व वाहनांची संख्या प्रचंड असल्याने व्यापाºयांनी ४०० वाहनांचा लिलाव करून उर्वरित वाहनांचा शुक्रवारी लिलाव केला जाईल, असे सांगितले. यावेळी व्यापारी, शेतकरी व बाजार समिती प्रशासनाशी यावर चर्चा होऊन देखील लिलाव झाला नाही. यामुळे काही शेतकºयांनी आपली वाहने पुन्हा परत नेली तर काही शेतकरी बाजार समितीच्या आवारात रात्रभर कांद्याची वाहने उभी करून थांबले होते. यातील उर्वरित वाहनांचा लिलाव शुक्रवारी करण्यात आला. यावेळी २५० वाहने दाखल झाली होती. कांद्याला प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला तर सरासरी ११०० ते १३०० असा भाव होता.
कोरोनामुळे वेळोवेळी लॉकडाऊन व साठवलेला कांदा चाळीत सडू लागल्याने यावर्षी शेतकºयांना मोठा आर्थिक फटका कांद्यात बसला आहे. त्यात गेल्या ८ दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, ही वाढ अल्पकाळ राहिली. त्यामुळे शेतकºयांच्या नशिबी निराशाच आली. कोरोना आजारामुळे शेतकºयांची आर्थिक बजेट कोलमडले असून उर्वरित कांद्याला २० रुपये तरी भाव मिळावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकºयांनी केली होती. राज्य व केंद्र सरकार या मागणीकडे अद्यापही लक्ष देतांना दिसत नाही.
शुक्रवारी बाजार समितीत कर्मचाºयांचा संप होता. मात्र, गुरुवारी पूर्ण लिलाव न झालेल्या वाहनांचा लिलाव शेतकºयांचे हित लक्षात घेऊन करण्यात आला. व्यापाºयांनीही सहकार्य केल्याने हा लिलाव झाल्याची माहिती सचिव अशोक मोरे व शाखा प्रमुख संजय बावा यांनी दिली.