कांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:09 PM2019-03-25T23:09:24+5:302019-03-25T23:10:02+5:30
पिंपळनेर उपबाजार समिती : २५ वाहनांतील कांद्याचा लिलाव
पिंपळनेर : येथील उपबाजार समितीत सोमवारी कांदा लिलावाला सुरूवात झाली. कांद्याला ८०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला. यावेळी २५ वाहनातील कांद्याचा लिलाव करण्यात आला.
संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध असलेले पिंपळनेर येथील कांदा मार्केट बऱ्याच दिवसानंतर सोमवारी सुरू झाले. कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये भाव देण्यात आला. कांदा खरेदी शुभारंभ व्यापारी भाऊसाहेब मराठे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कांदा खरेदी करणारे व्यापारी उपस्थित होते.
या हंगामातील खरेदीचा सोमवारी प्रथम दिवस असल्याने बाजार समितीत कांद्याचे २५ वाहन आले होते. येथील उपबाजार समितीत जास्त करून लाल कांद्याला मागणी असल्याने येथील कांदा हा देशातील इतर राज्यांसह परदेशात निर्यात होत असतो. कांदा लिलाव बोली लावली असता ६०० ते ८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव देण्यात आला तर लहान कांद्याला पाचशे रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल असा भाव देण्यात आला. गेल्यावर्षी जुन्या कांद्याला भाव न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा चाळीत टाकला. मात्र, हा कांदा खराब झाला. तर काही शेतकऱ्यांना अल्प दरात मालाची विक्री करावी लागली. यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तरीही शेतकºयांनी यावर्षी मोठ्या कष्टाने कांदा उत्पादन केले असून येत्या हंगामात शेतकºयांना कांदा काय भाव देऊन जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.