धुळे जिल्ह्यातील ३० टक्के ग्राहकांनी भरले आॅनलाइन बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:15 AM2019-07-16T11:15:51+5:302019-07-16T11:16:44+5:30

जून महिन्यात ९ कोटी ८४ लाखांचा केला भरणा, आॅनलाइन वीज बिल भरण्याकडे कल वाढला

Online Bill, filled with 30% of the population in Dhule district | धुळे जिल्ह्यातील ३० टक्के ग्राहकांनी भरले आॅनलाइन बील

धुळे जिल्ह्यातील ३० टक्के ग्राहकांनी भरले आॅनलाइन बील

Next
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात ४ लाख २२ हजार ग्राहकयापैकी १ लाख २० हजार ग्राहकांनी आॅनलाइन वीजबिल भरले९ कोटी ८४ लाखांचा महसूल जमा


आॅनलाइन लोकमत
धुळे : सर्वच क्षेत्रात आता पेपरलेस कारभाराकडे वाटचाल सुरू असून, त्याला आता महावितरणही अपवाद राहिलेले नाही. महावितरणनेही ग्राहकांना वीजबिल आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकाही याचा वापर आता करू लागले असून, गेल्या जून महिन्यात जिल्ह्यातील ३०.३५ टक्के ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला. यातून ९ कोटी ८४ लाख ५१ हजाराचा महसूल महावितरणच्या खात्यात जमा झाल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश पौनिकर यांनी दिली आहे.
वीज बिल आली की ते भरण्यासाठी महावितरणच्या अथवा ज्या-ज्या ठिकाणी बिल भरण्याची सुविधा आहे, तेथे प्रचंड गर्दी होत असते. बील भरण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागायचे.
परंतु स्मार्टफोनमुळे ग्राहकांना घरबसल्या वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचा वापर करून वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून वीज बिल भरता येऊ लागले आहे.
मोबाईल अ‍ॅपवरून वीज बिलाचा सहज भरणा करता येत असल्याने, अनेकजण आता त्याचाच वापर करू लागले आहे. वीज बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्यापेक्षे घरबसल्या अगदी इंटरनेट मोबाईलसह इतर अनेक सुविधांद्वारे वीज बिल भरून लाभ घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय.
धुळे जिल्ह्यात वीज वितरणची ग्राहक संख्या ४ लाख २२ हजार ६०९ एवढी आहे. यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. जून २०१९ मध्ये जिल्ह्यातील ३०. ३५ टक्के ग्राहकांनी म्हणजे जवळपास १ लाख २० हजार वीज ग्राहकांनी आॅनलाइनद्वारे वीज बिल भरणार केला. त्यातून महावितरणच्या खात्यात तब्बल ९ कोटी ८४ लाखांचा महसूल जमा झालेला आहे.
ग्राहकांचा वाढता प्रतिसाद
आता मीटर रिडींग घेतल्यानंतर किती रिडंीग वीज वापरली आहे याचा मेसेज संबंधित ग्राहकांच्या मोबाईलवर येतो. त्यानंतर काही दिवसांनी वीज बिलही मोबाईलवर येते. आता महावितरणही बील देण्याची पद्धत हळूहळू बंद करीत आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये महावितरणचा कारभारही पेपरलेस झालेला दिसून येईल. त्यामुळे वीज बिल भरणा केंद्रावरही काही महिन्यांनी शुकशुकाट दिसून येईल. दरम्यान वीज बिल नियमित आले पाहिजे अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.

 

Web Title: Online Bill, filled with 30% of the population in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे