धुळे जिल्ह्यात ‘मुल्यमापन’चे आॅनलाईन गुणांकन रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:51 PM2017-11-20T13:51:19+5:302017-11-20T20:25:50+5:30
पेपर तपासून आॅफलाईन गुण दिले, शिक्षकांचा आॅनलाईन कामावर बहिष्काराचा परिणाम
आॅनलाईन लोकमत
धुळे : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती पडताळण्यासाठी पायाभूत व संकलित चाचण्या शिक्षण विभागाकडून नुकत्याच घेण्यात आल्या. परंतु जि.प.च्या प्राथमिक शिक्षकांचा आॅनलाईन कामावर बहिष्कार असल्याने मुल्यमापन चाचणीचे आॅनलाईन गुण भरण्याची प्रक्रिया रखडल्याची माहिती मिळाली आहे.
शिक्षण विभागातर्फे ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान पायाभूत व संकलित चाचणी घेतली. इयत्ता पहिली व दुसरीसाठी मराठी गणित, तिसरी ते पाचवीसाठी मराठी, गणित व इंग्रजी, तसेच सहावी ते आठवीसाठी मराठी, इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाची ही चाचणी होती. पहिल्या सत्रातील ही दुसरी चाचणी होती. यात ३० गुणांची लेखी व दहा गुणांची तोंडी अशी एकूण ४० गुणाची चाचणी होती.
मुल्यमापन चाचणी सुरळीत पार पडली. शिक्षकांनी पेपर तपासून गुणही दिलेले आहेत. मात्र शिक्षकांनी गेल्या सप्टेंबरपासूनच २३ प्रकारच्या विविध आॅनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकलेला असल्याने, या मुल्यमापन चाचणीचे आॅनलाईन गुणच भरण्यात आलेली नसल्याची माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयाने दिली.
दरम्यान गुण भरलेले नसल्याने, शासनाला याची माहिती मिळू शकणार नाही.
शाळा सिद्धी अंतर्गतच हा कार्यक्रम आहे. गुणांकन नसल्याने, कोणती शाळा कोणत्या ‘ग्रेड’मध्ये आहे, ते समजण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान ‘ए’श्रेणीत येणाºया शाळेलाच चटोपाध्याय, व निवड श्रेणी लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.
आॅफलाईनला परवानगी
द्यावी : पाटील
आॅनलाईन कामकाज बंद असल्याने, शासनाने शिक्षकांना आॅफलाईन माहिती भरायला परवानगी दिली पाहिजे. मात्र त्याकडेसुद्धा संबंधित विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याची प्रतिक्रीया शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.ं