भूमिअभिलेख कार्यालयात ‘ऑनलाईन’ गोंधळ

By admin | Published: May 15, 2017 11:28 AM2017-05-15T11:28:56+5:302017-05-15T11:28:56+5:30

दाखले घेणा:या नागरिकांना, कर्मचा:यांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने गोंधळात अधिकच भर पडत आहे

'Online' mess in land records office | भूमिअभिलेख कार्यालयात ‘ऑनलाईन’ गोंधळ

भूमिअभिलेख कार्यालयात ‘ऑनलाईन’ गोंधळ

Next

ऑनलाइन लोकमत

साक्री, जि. धुळे, दि. 15 -  भूमिअभिलेख कार्यालयातून मिळणारे दाखले 1 मे पासून ऑनलाईन झाल्याने भूमिअभिलेख कार्यालयात ऑनलाईन गोंधळ सुरू झाला आहे. यासंदर्भात दाखले घेणा:या नागरिकांना, कर्मचा:यांकडून योग्य  मार्गदर्शन मिळत नसल्याने गोंधळात अधिकच भर पडत आहे. ‘ऑनलाईन’मुळे कामकाज सुरळीत होण्याऐवजी अधिकच किचकट होत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ऑनलाईन दाखल्यांसाठी महाऑनलाईन  लिमिटेडकडून या सेवांचा वापर कसा करावा, याबाबत 2 ऑक्टोबर 2016 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचारी व अधिका:यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तरीही भूमिअभिलेख कार्यालयात दाखले घेण्यासाठी नागरिक गेले तर त्यांना सरळ सेतू सेवा केंद्रावर पाठविण्यात येते. त्या ठिकाणी गेल्यावर संबंधित सेतू केंद्रावर प्रशिक्षण घेतलेला कर्मचारी हजर नसला तर तो नकार देतो. एखाद्या सेतू केंद्रावर ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याला पुन्हा भूमिअभिलेख कार्यालयात यावे लागते. तेथे पुन्हा चलन दिले जाते. ते चलन घेऊन त्याला पुन्हा सेतू केंद्रावर जावे लागते.
फी भरण्याबाबत गोंधळ
एवढे ‘दिव्य’ पार पाडल्यावर दाखल्यांसाठी किंवा मोजणीसाठी फी कुठे भरावी किंवा कोणत्या ‘हेड’खाली भरावी याची कोणतीही माहिती साक्री कार्यालयातील कर्मचा:यांना नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून लोकांना या कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागत आहेत.
साक्री येथील कार्यालयात कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने लोकांची अधिकच गैरसोय होत आहे. शिरपूर येथील अधिका:याकडे साक्रीचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्याने ते आठवडय़ातून कधीतरी त्यांच्या सोयीनुसार कार्यालयात येतात. तोर्पयत हे कार्यालयावर वा:यावर असते. लोकांना योग्य ते मार्गदर्शन व कर्मचा:यांकडून सौजन्यपूर्वक वागणूक मिळत नसल्याने याविषयी लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांची अपेक्षा
नागरिकांकडून दाखल्यांबाबत विचारणा झाल्यावर किमान कर्मचा:यांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांना नाहक सेतू सेवा केंद्रावर पाठविले जाते. यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाया जातात.
भूमिअभिलेख कार्यालयातून मिळणा:या ‘ऑनलाईन’ दाखल्यासंदर्भात आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहोत.
-एम.एस. बोकीळ
कार्यालयीन अधीक्षक, साक्री  

Web Title: 'Online' mess in land records office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.