नकाणे तलावात केवळ 10 दिवसांचा पाणीसाठा
By admin | Published: July 4, 2017 11:54 AM2017-07-04T11:54:59+5:302017-07-04T11:54:59+5:30
ऐन पावसाळ्यात टंचाईची चिन्हे : पावसाअभावी तापीवरून होणार पाणीपुरवठा
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.4 - शहर पाणीपुरवठय़ाचा मुख्य स्त्रोत असलेल्या नकाणे तलावात सद्य:स्थितीत केवळ 10 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास शहराच्या निम्म्या भागाला ऐन पावसाळयात टंचाईचा सामना करावा लागू शकतो़
सद्य:स्थितीत नकाणे तलावात 32 दलघफू पाणीसाठा उपलब्ध आह़े मनपाकडून दररोज 2 दलघफू पाणी नकाणे तलावातून उचलले जात़े त्यामुळे मृतसाठा वगळता अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आह़े जर पुढील दहा दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर संपूर्ण शहराला तापी योजनेवरून पाणीपुरवठा करावा लागणार आह़े संपूर्ण शहराचा भार तापी योजनेवर पडल्यास शहराला पाच ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल़ परिणामी शहरातील काही भागाला तीव्र पाणीटंचाई भासू शकत़े लोकसंख्येचा भार वाढल्याने मनपाला नकाणेतील आरक्षित पाणी पुरत नसून गळती, नासाडी यासारखे प्रश्न आहेत़ त्यामुळे पाटबंधारे विभागाने मनपाला सतत पत्र दिले आह़े