सहा महिन्यात डेंग्यूचे केवळ ३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:07 PM2020-07-27T21:07:14+5:302020-07-27T21:07:35+5:30
हिवताप कार्यालय : हिवतापचेही केवळ ५ रुग्ण
धुळे : प्रभावी अंमलबजावणी अणि आवश्यक त्या बाबींची ग्रामीण भागात केलेली जनजागृती लक्षात घेता गेल्या सहा महिन्यात केवळ हिवतापचे (मलेरिया) रुग्ण केवळ ५ आढळले तर डेंग्यूचेही ३ रुग्ण आढळून आले आहेत़
आरोग्य यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना आखल्या जात आहेत़ ग्रामस्थांना देखिल स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्ह्यातील हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली़
जिल्ह्यातील विविध गावात डेंग्यूसदृश्य आजाराने त्रस्त असलेले रुग्ण मागील वर्षी समोर येत होते़ ग्रामपंचायत विभागासह आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्यातरी अशी स्थिती पुन्हा वाढू नये यासाठी ग्रामस्थांना स्वच्छतेसह दक्षतेच्या सूचना देण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहेत़
हिवताप रुग्णांशी संबंधित जानेवारी महिन्यात ३० हजार ६३१ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ फेब्रुवारी महिन्यात ३५ हजार ६११ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ मार्च महिन्यात ३२ हजार १८१ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ एप्रिल महिन्यात २० हजार २२० रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ त्यापैकी केवळ २ रुग्णांना हिवतापची लागण झाली़ मे महिन्यात १९ हजार १२५ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ त्यापैकी केवळ २ रुग्णांना हिवतापची लागण झाली़ जून महिन्यात २३ हजार ११३ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ त्यापैकी केवळ एका रुग्णाला हिवतापची लागण झाली़
डेंग्यू रुग्णांशी संबंधित जानेवारी महिन्यात एका रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले़ फेब्रुवारी महिन्यात २, मार्च महिन्यात २, एप्रिल महिन्यात १०, मे महिन्यात ३ रुग्णांच्या रक्तांचे नमूने घेण्यात आले़ तसेच जून महिन्यांमध्ये मात्र धुळे तालुक्यात ३ रुग्ण हे डेंग्यूसदृष्य आजाराचे निघाले आहेत़
अशा कराव्यात उपाययोजना
^- आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ताप सर्वेक्षणाचे काम करुन घेण्यात यावे़
^- प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांची संयुक्त सभा घेवून ग्रामस्थांना स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात़
^- जोखीमग्रस्त भागात आवश्यकतेनुसार धुरळणी करावी़
^- आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे जनतेस सांगण्यात यावे़
^- पाणी साठवण्याचे भांडे हे धुवून, पुसून स्वच्छ व कोरडे करावे़
^- साठविलेल्या पाण्यात अॅबेटींग करण्यात यावे़
^- डबक्यामध्ये गप्पी मासे सोडावेत़
^- निरुपयोगी साहित्य नष्ट करावेत़
^- घराच्या खिडक्यांना बारीक जाळी बसविण्यात यावी़