धुळे-नंदुरबार जिल्ह्यात नाफेडतर्फे फक्त  ७,७८० क्विंटल धान्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:36 AM2018-02-02T11:36:02+5:302018-02-02T11:37:40+5:30

धुळ्यात एकाही शेतकºयाने आॅनलाईन नोंदणी केली नाही

Only 7,780 quintals of grain procurement through Nafed in Dhule-Nandurbar district | धुळे-नंदुरबार जिल्ह्यात नाफेडतर्फे फक्त  ७,७८० क्विंटल धान्य खरेदी

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात नाफेडतर्फे फक्त  ७,७८० क्विंटल धान्य खरेदी

Next
ठळक मुद्देनाफेडतर्फे पहिल्यांदाच आॅनलाईन खरेदीदोन्ही जिल्ह्े मिळून ७९२ शेतकºयांनी केली नोंदणीधुळ्यात दाण्याचीही आवक झाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  नाफेडच्यावतीने यावर्षी प्रथमच मूग, उडीद, सोयाबीनची आॅनलाईन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. धुळे-नंदुरबार जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. मात्र दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांकडून आॅनलाईन खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याच पाचपैकी चार खरेदी केंद्रावर ७९२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यांच्याकडून फक्त ७ हजार ७८० क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. 
पूर्वी मूग, उडीद आणि सोयाबीनची खरेदी हमी भाव न देताच केली जात होती. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र २०१७-१८  या खरीप हंगामासाठी शेतकºयांचा माल हा हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार ३ आॅक्टोबर ते १३ डिसेंबर १७ या कालावधित मूग, उडीदची हमीभावाने खरेदी झाली. तर सोयाबीनची खरेदी १५ जानेवारी २०१८ पर्यंत करण्यात आली. 
मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये, उडीदसाठी ५ हजार ४०० रुपये, तर सोयाबीनसाठी ३ हजार ५० रुपये हमीभाव देण्यात आला होता.
धुळे-नंदुरबारमध्ये पाच खरेदी केंद्र
नाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह दोंडाईचा, शिरपूर व नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा येथे सुरू करण्यात आले होते. 
७९२ शेतकºयांनी केली नोंदणी
मूग, उडीद व सोयाबीन आॅनलाईन खरेदीसाठी चार खरेदी केंद्रावर ७९२ शेतकºयांनी नोंदणी केली होती. यात शिरपूरला १०२, दोंडाईचाला ३०, शहाद्याला ५८२ व नंदुरबारला ७८ शेतकºयांचा समावेश आहे. 
सर्वाधिक खरेदी शहाद्यात
या आॅनलाईन खरेदी प्रक्रियेत सर्वाधिक खरेदी शहादा केंद्रावर झाली. येथे ५ हजार ६८५ क्विंटल धान्य खरेदी झाले. त्याखालोखाल शिरपूरला १ हजार १२८.११ क्विंटल, नंदुरबारला ७५४.५० क्विंटल व दोंडाईचाला २१३.९ क्विंटल धान्याची खरेदी झाली.
मूग, सोयाबीनची खरेदी नाही
नंदुरबार केंद्रावर मुगाची तर दोंडाईचा केंद्रावर सोयाबीनची खरेदी झालेली नाही. या ठिकाणी एकाही शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केलेली नव्हती.
धुळ्यात दाण्याचीही आवक नाही
धुळे-नंदुरबार असे दोन जिल्हे म्हणून दी महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती. त्यापैकी धुळे वगळता उर्वरित केंद्रावर बºयापैकी धान्य  खरेदी झाली.मात्र धुळ्यात मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी एकाही शेतकºयांने नोंदणी केली नाही. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीनच्या दाण्याचीही आवक झालेली नाही. 



 

Web Title: Only 7,780 quintals of grain procurement through Nafed in Dhule-Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.