‘स्मृतिभ्रंश’च्या केवळ अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 09:49 PM2019-09-11T21:49:13+5:302019-09-11T21:50:51+5:30

फॅक्टरी आग प्रकरण : सर्व जवान सुखरुप असल्याची माहिती

Only rumors of 'dementia' | ‘स्मृतिभ्रंश’च्या केवळ अफवा

dhule

Next

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटातील जखमी जवानांची प्रकृती स्थित आहे़ स्मृतीभ्रश झाल्याची केवळ अफवाच आहे़ अशी माहिती राज्य राखीव पोलिस दलाचे समादेश संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़
वाघाडी गावाजवळील केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटात १४ ठार तर ७२ जण जखमी झाले होते़ याप्रकरणी रूमीत केमिसिंथ (केमिकल्स) प्रा़लि़ कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही़ ३१ आॅगस्ट रोजी सकाळी झालेल्या स्फोटात १३ जणांचा जागीच मृत्यु तर ७२ जण जखमी झाले होते़ घटनेच्या तिसऱ्या दिवशी बेपत्ता असलेल्या एकाचा मृतदेह कंपनीपासून ५०० मिटरवर असलेल्या नाल्याच्या किनारी सापडला होता़ त्यामुळे या घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यु झाला आहे़ अद्यापही अनेक जखमी कामगार उपचार घेत आहेत़ कंपनीतील एका कामगारानेच या घटनेत कंपनी व्यवस्थापन जबाबदार असून त्यांचे हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच सदरची घटना घडली़ त्यामुळे कंपनी व्यवस्थापन विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहेग़ुन्हा नोंदवून देखील ११ दिवस उलटले तरी पोलिसाकडून काहीच कारवाई झालेली नाही़ नेमके कशामुळे ही घटना घडली ते देखील अनुत्त्तरीतच आहे़ घटना घडल्यानंतर तेथील केमिकल्सचे ड्रम व पावडर अन्यथा हलविण्यात आले आहे़ सद्यस्थितीत तेथे वॉचमन वगळता कुणाही नाही़ दरम्यान, आमदार अमरिशभाई पटेल यांनी पटेल परिवाराकडून मृतांना प्रत्येकी ६० हजार रूपयांची आर्थिक मदत, जखमींना किराणा माल तर अनाथ झालेल्या पाल्यांचे शिक्षण व राहण्याचा सर्व खर्च करण्याचे जाहिर केले आहे़ रूमित केमिकल्स फॅक्टरी प्रशासनाने सुध्दा मृतांच्या कुटुंबासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी रोख २५ हजार रूपये दिलेत तर त्यांच्या वारसांना पुन्हा ५ लाख रूपयांचा निधी नुकताच तहसिल प्रशासनाच्या उपस्थितीत देण्यात आला़
वाघाडीतील आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेले सर्व जवान सुखरूप आहेत़ स्मृतीभ्रंश वगैरे झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही़
-संजय पाटील,
राज्य राखीव पोलिस दल, समादेशक

Web Title: Only rumors of 'dementia'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.