उघडय़ावर शौचास बसणा:या 10 जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 12:14 AM2017-01-14T00:14:45+5:302017-01-14T00:14:45+5:30
उघडय़ावर शौचास बसून अस्वच्छता व आरोग्यास बाधा निर्माण करणा:या दहा जणांच्या विरोधात दोंडाईचा नगरपालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी पहाटे कारवाई केली आहे.
दोंडाईचा : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत उघडय़ावर शौचास बसून अस्वच्छता व आरोग्यास बाधा निर्माण करणा:या दहा जणांच्या विरोधात दोंडाईचा नगरपालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी पहाटे कारवाई केली आहे. या दहाही जणांना पथकाने दोंडाईचा पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्या विरोधात प्रत्येकी 100 रुपयाच्या दंडाची आकारणी करून त्यांना तंबी देण्यात आली आहे.
बुधवारी न.पा.च्या गुड मॉर्निग पथकाने शहरातील विविध परिसरात फिरून उघडय़ावर शौचास बसणा:या 104 जणांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार केला होता. या वेळी तंबी देऊनही नागरिक ऐकत नसल्यामुळे शुक्रवारी पहाटे पुन्हा कारवाई करण्यात आली.
नगराध्यक्षा नयनकुवर रावल, आरोग्य सभापती वैशाली महाजन यांच्या मार्गदर्शनखाली गुड मॉर्निग पथकाची स्थापना केली आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या पथकाने पोलिसांच्या मदतीने शहरातील म्हाळसानगर, चैनी रोड, मांडळ चौफुली, अमरावती नदी पात्र या ठिकाणी पाहणी केली. तेथे उघडय़ावर शौचास बसणा:यांच्या विरोधात कारवाई केली आहे. तसेच यापुढे उघडय़ावर शौचास बसू नका, अशी तंबीही दिली आहे. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी रोहिदास वारूडे, पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, आरोग्य कर्मचारी शरद महाजन, कांतीलाल मोहिते, राजेंद्र चौधरी, नीलेश लोट उपस्थित होते.