वृद्ध पित्यास 18 हजार पोटगीसह सुसज्ज निवारा देण्याचे आदेश
By admin | Published: January 14, 2017 12:08 AM2017-01-14T00:08:17+5:302017-01-14T00:08:17+5:30
वृद्ध पित्यास त्याच्या तिन्ही मुलांनी मिळून दरमहा 18 हजार रु.ची पोटगी द्यावी, असा आदेश धुळे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी नुकताच दिला.
धुळे : शहरातील देवपूर भागातील जयहिंद कॉलनीतील रहिवासी वृद्ध पित्यास त्याच्या तिन्ही मुलांनी मिळून दरमहा 18 हजार रु.ची पोटगी द्यावी, असा आदेश धुळे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी नुकताच दिला. अर्ज दाखल केल्यापासून केवळ तीन महिन्यात हा निकाल देण्यात आल्याने वृद्ध पित्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
तक्रार अर्जानुसार, जयहिंद कॉलनीतील रहिवासी शंकरराव नारायण देवरे यांना त्यांची मुले भूषण देवरे, प्रशांत देवरे व नितीन देवरे यांनी दमदाटी व शिवीगाळ करत त्यांच्या मालकीच्या घराबाहेर काढण्याचा प्रय} केला. परंतु ते तेथेच राहिले. मोठय़ा व मधल्या मुलाने मिळून त्यांना मृत्यूपत्र लिहिण्यास भाग पाडले. दोन नंबरच्या मुलाने जयहिंद संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा लिहून घेतला. तसेच त्या जागेवर स्वत: सभासद बनला.
देवरे यांना कोणताच निवारा न उरल्याने ते निराश्रीत झाले. नातेवाईक व मित्रमंडळीकडे काही दिवस काढले. परंतु त्यांना कोणताही निवारा नसल्याने ते जयहिंद कॉलनीतील त्यांच्या प्लॉट क्र.177 येथील घरी गेले. परंतु प्रशांत याने, तुमचा या घराशी काही संबंध व हक्क नसल्याचे सांगून त्यांना हाकलून लावले. तसेच त्यांच्या स्वकष्टार्जित इस्टेटीमधून वाटणी मागण्याचा दिवाणी दावा टाकून त्रास देण्याचा प्रय} केला. त्यामुळे शंकरराव देवरे यांनी सकष्टार्जित इस्टेटीमधून कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने प्रतिवादी तिघा मुलांकडून प्रत्येकी 10 हजार रु. उदरनिर्वाहासाठी पोटगी व न्याय मिळण्यासाठी धुळे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यात मोठय़ा मुलाचे उत्पन्न 6 लाख, मधल्या मुलाचे 12 लाख व धाकटय़ा मुलाचे उत्पन्न 4.5 लाख असल्याचे नमूद केले.या प्रकरणात दोन्ही बाजूंना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस दिली होती. सुनावणीवेळी मोठय़ा मुलाने 4 हजार, दोन नंबरच्या मुलाने 2 ते अडीच हजार व लहान मुलाने 2 हजार रु. देण्याची तयारी न्यायाधिकरणासमोर दर्शविली. 2 रोजी उपविभागीय अधिकारी मिसाळ यांनी निर्णय दिला. त्यानुसार भूषण देवरे यांनी 8 हजार, मधला मुलगा प्रशांत याने 6 हजार व लहान मुलगा नितीन देवरे याने 4 हजार रुपये असे मिळून 18 हजार रुपये दरमहा बॅँक खात्यात 5 तारखेर्पयत जमा करावे, जयहिंद कॉलनीतील बंगल्यात टॉयलेट, बाथरूम व टीव्ही संच असलेली सुसज्ज रूम देण्याचे आदेश दिले. आदेश न पाळल्यास एक महिना कारावासाची शिक्षा देण्यात येणार येईल, असेही नमूद आहे.