बीएलओंनी मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:54 AM2018-05-12T11:54:29+5:302018-05-12T11:54:29+5:30
साक्री : कार्यशाळेत तहसीलदार संदीप भोसले यांचे मार्गदर्शन
आॅनलाइन लोकमत
साक्री (जि.धुळे) : तालुक्यातील बीएलओंनी मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश साक्री येथे आयोजित बैठकीत तहसीलदार संदीप भोसले यांनी दिले. तसेच ज्या मतदारांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट नाहीत. त्यांची नावे समाविष्ट करून घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
साक्री तहसील कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा झाली. कार्यशाळेत तालुक्यातील २२० बीएलओंना प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार व्ही. डी. ठाकूर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदार भोसले पुढे म्हणाले, बºयाचदा एका कुटुंबात राहणाºया सदस्यांची नावे वेगवेगळ्या वार्डांमध्ये येतात. त्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण होतात.
हे टाळण्यासाठी बीएलओंची भूमिका महत्त्वाची आहे. ही तपासणी करत असताना मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी त्या मतदाराच्या घराला ठराविक असा सांकेतिक क्रमांक देऊन नोंदणी करावी.
ज्या मतदारांचे वय १ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांची नवमतदार म्हणून नोंदणी करावी, असे प्रतिपादन तहसीलदार संदीप भोसले यांनी येथे केले. कोणत्याही मतदाराला प्रत्यक्ष भेटल्या शिवाय त्याचे नाव वगळण्यात येऊ नये.
काही मतदारांकडे एका पेक्षा जास्त मतदान कार्ड असतील व त्यांची नावे एका पेक्षा जास्त ठिकाणी असतील तर कोणत्याही एकाच ठिकाणी नोंदणी करावी. मात्र, यासाठी त्या मतदाराची स्वाक्षरी घेऊन आपल्याकडे पुरावा ठेवावा. या वेळी अनिल जोने, प्रवीण मोरे, राजेंद्र त्रिभुवन व निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
सोनाली सोनवणे प्रथम :या कार्यशाळेत सुलभ निवडणुका व त्याविषयी सामान्य ज्ञानावर आधारित ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत घोडदे (ता. साक्री) येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोनाली योगेंद्र सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांचे तहसीलदार भोसले यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.