पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:59+5:302021-05-29T04:26:59+5:30
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग हे बंद ...
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग हे बंद होते. त्यामुळे सदर आस्थापनांमध्ये काम करणारे परप्रांतीय, स्थानिक कामगार, मजूर हे त्यांचे गावी निघून गेले आहेत. शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या औद्योगिक आस्थापनांना व्यवसाय उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छूक उमेदवारांकरिता सदर ऑनलाईन रोजगार मिळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.roigar.mahaswayam.gov या वेब पोर्टवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवरांच्या व्हीडीओ कॉन्फरंस तसेच मोबाईल दुरध्वनीव्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी वेबपोर्टलला लॉग-इन करावे. नोकरी इच्छूक उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.roigar.mahaswayam.goc.in या वेब पोर्टवर नोंदणी करावी, लॉगीन करुन मेळाव्यातील उपलब्ध रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे. असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. श्री. कोल्हे यांनी केले आहे.