आयुर्वेदाला नव्हे, 'मिक्सोपॅथी'ला आमचा विरोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:31+5:302021-09-27T04:39:31+5:30
धुळे - आयुर्वेद किंवा इतर कोणत्याही उपचार पद्धतींना आमचा विरोध नसून, केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या 'मिक्सोपॅथी'ला आमचा विरोध असल्याचे ...
धुळे - आयुर्वेद किंवा इतर कोणत्याही उपचार पद्धतींना आमचा विरोध नसून, केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या 'मिक्सोपॅथी'ला आमचा विरोध असल्याचे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी केले. धुळे जिल्हा आयएमए आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चसत्रात देशभरातील डॉक्टर्स ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
पुढे बोलताना लोंढे यांनी सांगितले की, आयुर्वेद, युनानी किंवा इतर पॅथी त्यांच्या पद्धतीने उपचार करतात. पण गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया हा आधुनिक विज्ञानाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे इतर पॅथीना शस्त्रक्रियेची परवानगी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेचे कुलसचिव डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ‘वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. नीलिमा मिश्रा यांनी ‘महिला डॉक्टरांचे आरोग्य क्षेत्रातील स्थान’ या विषयावर, तर डॉ. जयेश लेले यांनी ‘आय.एम.ए.च्या राष्ट्रीय घडामोडी’, डॉ. शिवकुमार उत्तुरे : महाराष्ट्र मेडिकल काैन्सिलचे कामकाज, डॉ. अशोक आढाव यांनी आय.एम.ए.चा भूतकाळ, वर्तमान व भविष्य या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सुहास पिंगळे, डॉ. प्रकाश देव, डॉ. प्रकाश मराठे, डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. राजीव अग्रवाल, डॉ. मंगेश पाटे, डॉ. संतोष कदम आदी तज्ज्ञांनीही संबोधित केले. आय.एम.ए.चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्या आवाहनानुसार आय.एम.ए च्या सदस्यांनी गोळा केलेला १ लाख रुपयांचा निधी संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात आला.
चर्चसत्राच्या यशस्वितेसाठी डॉ. रवी वानखेडकर, डॉ. राधेशाम रोडा, डॉ. मीनल वानखेडकर, डॉ. मंदार म्हस्कर, डॉ. जयंत देवरे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. सचिन ढोले, डॉ. नीता बियाणी, डॉ. नीता हटकर, डॉ. योगेश बोरसे, डॉ. सुरेश वसईकर, डॉ. महेश अहिरराव, डॉ. महेंद्र राजपूत, डॉ. शिल्पा पवार, डॉ. ज्योती तिवारी, डॉ. भाग्यश्री अहिरराव, डॉ. यतिन वाघ यांनी परिश्रम घेतले.