अठरा हजारांपैकी साडेसहा हजार थकीत मालमत्ताधारकांनी भरला तीन कोटीचा कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:08 PM2019-12-14T23:08:24+5:302019-12-14T23:08:40+5:30
राष्ट्रीय लोकअदालत । यंदा महापालिकेने वसुलीचा उच्चांक गाठला ; सात कोटीवर जाण्याची शक्यता
धुळे : मालमत्ता थकीत कर आणि शासकीय वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात आली़ एकाच दिवशी सुमारे साडेसहा हजार नागरिकांनी कराच्या स्वरूपात स्वरूपात २ कोटी २० लाखांची रक्कम भरली़ दरम्यान यावेळी नागरीकांकडून प्राप्त झालेल्या २५०० धनादेशातून अंदाजे सात कोटीपर्यत कर वसुल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़
जिल्हा न्यायालयात दहा हजार रुपयांवरील मालमत्ता धारकांना शास्तीमाफीची सवलत देण्यासाठी शनिवारी जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळी ९ वाजेपासून जिल्हा न्यायालयात हजारोंच्या संख्येने नागरिक कर भरण्यासाठी उपस्थित होते़ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत साडेपाच ते सहा हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला थकीत मालमत्ता कराचा भरणा केला़ नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास गैरसोय होऊ नये यासाठी धनादेश संकलनासाठी स्टॉल उभारले होते़ यावेळी आयुक्त अजिज शेख, न्यायाधीश क्षिरसागर, न्यायाधीश एम़ सैय्यद, न्यायाधीश डोंगरे, न्यायाधीश एम़ एम़ निकम, प्रबंधक आऱ बी़ चव्हाण, अधिक्षक एम़बी़ भट, नसिम अन्सारी, प्रदिप सांगळे, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाठ, नगरसचिव मनोज वाघ, कर संकलन अधिकारी बी़ एस़ रणाळकर, दिपककांत वाघ, नामदेव भामरे, नारायण सोनार, अभियंता चंद्रकांत ओगले, मधूकर निकुंभ, मुस्तार शहाबाज, शिरीष जाधव, राजकुमार सोनवणे, वसिम पठाण, अनिल सांळूखे, प्रसाद जाधव, डीवायएसपी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे उपस्थित होते़
साडेसहा हजार नागरिकांना लाभ
लोकअदालतीद्वारे नागरिकांना शास्ती सवलतीसाठी शनिवारी मुदत देण्यात आली होती़ त्यासाठी हजार सायंकाळी पाच वाजेपर्यत १ कोटी ८० लाख रूपये रक्कम जमा झाली होती़ ्कर भरण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्यामुळे सायकाळी ६ वाजेपर्यत २ कोटी २० लाखांची रोख रक्कम वसूल झाली होती़ तर अडीच हजार धनादेश प्राप्त झाले. धनादेश व रोख रक्कमेच्या स्वरूपात अंदाज ७ लाख कर वसुलीचा अंदाज आहे़
सुटीच्या दिवशी कामकाज सुरू
शनिवारी रात्री उशिरापर्यत मालमत्ता वसुलीचे काम सुरू होते़ रविवारी महापालिकेत रोख रक्कम व धनादेश स्वरूपात प्राप्त झालेली रक्कमेचा हिशोब होणार आहे़