जिल्ह्यातील ७०% रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 07:36 PM2020-07-24T19:36:11+5:302020-07-24T19:36:26+5:30

आतापर्यंत १५९९ रुग्ण झाले बरे

Over 70% of patients in the district overcome corona | जिल्ह्यातील ७०% रुग्णांची कोरोनावर मात

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. मात्र दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यने दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र एकूण २२९२ बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १५९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गत आठवड्यात ३७० रुग्ण झाले कोरोनामुक्त -
मागील आठवड्यात १७ जुलै ते २२ जुलै दरम्यान ३७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १७ जुलै रोजी ९२ रुग्ण रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. १८ रोजी २२, १९ रोजी १०१ तर २० जुलै रोजी ३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गत आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असताना कोरोनामुक्त होणाºया रुग्णांच्या लक्षणीय संख्येमुळे दिलासा मिळाला आहे. घाबरून न जाता वेळीच उपचार घेतले तर कोरोनावर सहज मात करणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, २१ जुलै रोजी २१, २२ रोजी ७१ तर २३ रोजी ४६ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.
धुळे शहरातील ८३९ रुग्ण कोरोनामुक्त -
धुळे शहरात आतापर्यंत १११६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४५ जणांचा मृत्य झाला आहे तर २३२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
धुळे तालुक्यातील ५८ कोरोनामुक्त -
धुळे तालुक्यातील ५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत तालुक्यातील १४४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ७७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

शिरपूर तालुक्यातील ५५६ रुग्ण कोरोनामुक्त -
शिरपूर तालुक्यात एकूण ७४० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. धुळे शहरानंतर सर्वाधिक बाधित रुग्ण शिरपूरात आढळले आहेत. तालुक्यातील ५५६ रुग्ण बरे झाले आहेत. २३ जणांचा मृत्यू झाला असून १६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील ७८ कोरोनामुक्त -
शिंदखेडा तालुक्यातील १४३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून ६० जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.

साक्री तालुक्यातील ६८ कोरोनामुक्त -
साक्री तालुक्यातील ६८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण १४९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ रुग्ण उपचार घेत आहेत.
 

Web Title: Over 70% of patients in the district overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.