पालखी सोहळा आज, जय्यत तयारी पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 10:47 PM2019-09-06T22:47:38+5:302019-09-06T22:47:54+5:30

पिंपळनेर : विठ्ठल मंदीर संस्थानतर्फे आयोजित नामसप्ताह महोत्सवात सोंगे पाहण्यासाठी होतेय गर्दी 

Palanquin Ceremony Today, Glory preparation is complete | पालखी सोहळा आज, जय्यत तयारी पूर्ण 

नामसप्ताह महोत्सवांतर्गत गुरूवारपासून गावात वाद्यांच्या गजरात सोंगे काढण्यास प्रारंभ झाला. गावातून मिरवण्यापूर्वी सोंगे विठ्ठल मंदिरात येऊन सेवा रूजू करताना. नंतर गावात वाद्यांच्या गजरात सोंगे काढली जातात. 

Next

पिंपळनेर : येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे शनिवार ७ रोजी साजरा होणाºया पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून मुस्लिम बांधवांकडून परंपरेने पालखीचे स्वागत होणार आहे. तर शनिवारी पहाटे मंदिरात महाकाकडा आरतीचे आयोजन व गुलालाची उधळण करण्यात येणार आहे. 
आज महाकाकडारती 
समर्थ सदगुुरू श्री खंडोजी महाराज यांची १९१ पुण्यतिथी निमित्ताने श्री नामसप्ताह महोत्सव साजरा होत आहे. शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते सात वाजता मंदिरात महाकाकडाआरती व गुलालाची उधळण करण्यात येईल. यासाठी मंदिरात गुलाल उधळण येईल. तर रात्री अकरा वाजता मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ प्रारंभ होईल.
या वेळी पंचक्रोशीतून विविध म्हशी दिंडी पालखी सोहळ्यासाठी गावात येत असतात की डोळ्यापुढे या भजनी दिंडी भजन सादर करीत असतात, भाविक मोठ्या संख्येने पालखी सोहळ्याचे जागोजागी मठाधिपती योगेश्वर महाराज यांच्यासह पालखीचे भव्य स्वागत फुलांचा वर्षाव होणे, तसेच रांगोळ्या काढून फुलांचे रस्ते बनवण्यात येते. 
सोंगे पाहण्यासाठी गर्दी 
या पालखी सोहळा वेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने पायदळी सोंगाची धूम असते. पायदळी सोंगामध्ये गणपती सरस्वती, सूर्य-चंद्र, इंद्रजीत, नरशिव, रावण, सुपरणखा, टंट्या, खंडेराव, कालिकामाता, वाघ आणि विविध सोंग डफ पिंगाणी या वाद्यांच्या तालावर काढण्यात येत असतात. गावाच्या मुख्य भागातून सदर सोंग हे मिरवले जात असते. नागरिकांची सोंग पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यासाठी आबालवृद्धांमध्ये सारखाच उत्साह दिसून येत आहे. 
मुस्लिम बांधवांसह जागीरदार घराण्यातर्फे होणार स्वागत 
या पालखी सोहळ्या वेळी मराठा पाटील समाज मंडळ व जागृती मित्र मंडळ यांच्यातर्फे  सजीव देखावा वहन देखावा पाहण्यासाठी महिलांसह पुरुषांची मोठी गर्दी असते. रात्री एक वाजेच्या सुमारास बाजारपेठेतील जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधव व समाजाचे जागीरदार घराण्यातर्फे पालखीचे व मठाधिपती योगेश्वर महाराजांचे स्वागत केले जाईल. हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी मस्जिद परिसरात दरवर्षी मोठी गर्दी होत असते. 
पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त
यात्रा उत्सवात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी सर्व आढावा घेऊन पोलिस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे यावेळी गावाच्या मुख्य चौकात रस्त्यांवर विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
कुस्ती दंगलीसाठी मैदान सज्ज
 रविवार ८ सप्टेंबर रोजी होणाºया भव्य कुस्ती दंगलीसाठी पारंपरिक कुस्ती मैदान सज्ज करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सोमवार ९  रोजी आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन होणार आहे यासाठी दोन्ही समित्यांकडून तयारी करण्यात येत आहे तसेच कुस्ती मल्लांनी व आदिवासी नृत्य सादर करणाºया कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

Web Title: Palanquin Ceremony Today, Glory preparation is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे