पालकांनो, ‘वॉर्निंग सिग्नल’कडे द्या लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:43 PM2019-12-19T22:43:06+5:302019-12-19T22:43:30+5:30

महाविद्यालयीन युवकांच्या आत्महत्या : किरकोळ कारणामुळे विद्यार्थी उचलताय टोकाचे पाऊल

Parents, pay attention to the 'warning signal' | पालकांनो, ‘वॉर्निंग सिग्नल’कडे द्या लक्ष

पालकांनो, ‘वॉर्निंग सिग्नल’कडे द्या लक्ष

Next

धुळे : अभ्यासाचा ताण, पे्रमसंबंध किंवा किरकोळ कारणावरुन अल्पवयीन मुले, महाविद्यालयीन तरुण-तरुणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत़ गेल्या वर्षभरात शहरात ८ ते १० महाविद्यालयीन युवकांनी आपले जीवन संपविले आहे़ ही चिंताजनक बाब असून पालकांनी याकडे सुरवातीपासून लक्ष देण्याची गरज असल्याचे समोर येत आहे़
आत्महत्यासारख्या घटना घडण्यापुर्वी अशा मुलांचे वागणे, बोलणे, हावभाव यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडत असतात़ या बदलालाच मानसिक आजारात ‘वॉर्निंग सिग्नल’ असे म्हटले जाते़ त्यामुळे पालकांनी अशा प्रकारच्या ‘वॉर्निंग सिग्नल’कडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ सध्या तरुणाईला प्रेमासोबतच आॅनलाईनचे वेड लागलेले आहे़ परिणामी हिंसाचाराची भावना वाढीस लागणे स्वाभाविक आहे़ प्रेमाच्या मोहजाळ्यात तरुणी फसल्या की मुलाचा हात धरुन पळून जातात़ अशाच प्रकारची प्रेम भंगाची घटना धुळ्यात घडल्यानंतर त्या तरुणाने नकाणे तलावानजिक असलेल्या विहिरीत आपले जीवन समर्पित करीत आत्महत्या केली़ तर शिरपूर तालुक्यात सुध्दा एका युवकाने आत्महत्या केली की त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले हे मात्र त्याच्या नातलगांना समजू शकलेले नव्हते़ या घटनेनंतर मृत झालेल्या युवकाच्या नातेवाईकांसह त्याच्या बहिणीने न्यायासाठी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याकडे धाव घेतली होती़
खरतंर तंत्रज्ञान गेल्या विस वर्षात इतक झपाट्याने वाढले आहे की प्रत्येक जण एकटा जगायला लागला आहे़ ‘हम दो हमारे दो’ या संस्कृतीमुळे मुलांना कुठलीही गोष्ट वाटुन घ्यावी लागते, ही सवय मुळात राहिलेली नाही़ सगळ्यात महत्त्वाचे मुलांना नकाराची सवयच राहिलेली नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे, असा अट्टाहास लहानपणापासूनच त्यांच्यात रुजविण्यात पालकांचा मोठा सहभाग असल्याचे समोर येत आहे़ तिन तासाचा पेपर तुमच भवितव्य ठरवु शकत नाही किंवा प्रेमभंग झाला तर ती व्यक्ती तुमचं आयुष्य हिसकावून घेण्याइतपत मोठी असु शकत नाही, हे समजविण्यात पालक निश्चितच कमी पडत आहे़ मुलाला विश्वासात घ्यायला निश्चितच पालक कमी पडत आहेत़ मुलांच्या भावनापर्यंत पोहचण्याइतपत वेळ पालक मुलांना देत नाहीत़ माणसाला जेव्हा एकटं वाटतं किंवा इतरांकडून अती जास्त अपेक्षा ठेवल्यावर त्या पुर्ण नाही झाल्या की आत्महत्याचे विचार माणसाच्या मनात येतात़ नैराश्यातुन आपल्याला बाहेर कौन्सलर बाहेर काढु शकतो याचा प्रचार होणे गरजेचे आहे़
संवादाच्या वर्तुळाअभावी एकटेपणा
बाबा, आई, दादा, ताई यांच्यातील संवादाचे वर्तुळ पूर्ण होत नाही़ त्यामुळे कुटुंबातील संवाद एकेरी होत चालला आहे़ आजच्या स्थितीत सर्वांच्याच हातात मोबाईल आले आहेत़ त्यामुळे प्रत्येक जण आपआपल्या दुनियेत वावरत असतो़ मग्न असतो़ मुलांमध्ये तयार होणाऱ्या विकृतीकडे पालकांनीही वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़
सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत कुटुंबातील सदस्यांनी शक्यतोअर मोबाईल बंदच ठेवावा़ जेणेकरुन एकमेकांमध्ये संवाद होऊ शकेल़ पालकांनी आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींच्या पालकांचा एक गृ्रप तयार करणे आवश्यक आहे़ आपल्या पालकांमध्ये संवाद आहे, ही बाब मुलांना माहिती झाल्यास ते खोटे बोलणे टाळतील़ आजच्या परिस्थितीत मुले-मुली हे एकप्रकारे बाराव्या वर्षीच वयात येऊ लागले आहेत़ त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे़
पालकांनी लक्ष दिल्यास घटना टळतील
प्रेमभंग, अभ्यासातील अपयश, आई-वडिलांसोबत बिघडलेले नातेसंबंध, मोबाईल आणि सोशल नेटवर्किंगचा अतिवापर आणि त्यामधून निर्माण होणारी ईर्षा, एकाकीपणा, हरवलेला संवाद, आभासी दुनियेत रममाण होण्याची लागलेली सवय आदी आत्महत्येमागील प्रमुख कारणे असू शकतील़
त्यासोबतच व्यक्तिचे मानसिक स्वास्थ आणि मानसिक आजार हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे़ नैराश्य, चिंता, व्यसनाधिनता ही काही महत्वाची कारणे मानली जातात़ नातेसंबंधातील कटूता, आर्थिक विवंचना, अतिमहत्वाकांक्षेपोटी निर्माण झालेली स्पर्धा आणि त्यानंतर निर्माण होणारे वैफल्य आणि उदासिनता या कारणामुळे आत्महत्येसारख्या घटना घडतात़ आत्महत्येचा प्रयत्न करण्यापुर्वी ती व्यक्ती आपल्याला त्याच्या बोलण्यातून ‘वॉर्निंग सिग्नल’ देत असते़ मदतीसाठी हाक देत असतात़ एकटे राहणे, झोप न लागणे, करमत नाही उदास वाटते असे बोलून दाखविणे असे होत असताना दाटलेल्या भावनांना सुध्दा वाट मोकळी करुन द्यायला हवी़
रुममेटने संवाद साधण्याची गरज
ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातून विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी राहत असतात़ बºयाच ठिकाणी दोन ते तीन मित्र साधारणपणे एका खोलीत असतात़ त्यामुळे अशा प्रकारे मानसिक आजाराची लक्षण असलेल्या आपल्या मित्राशी इतर रुममेटने लगेचच संवाद साधण्याची गरज आहे़ त्यांच्या मनातील नैराश्य दूर करण्यासाठी त्यांना बोलणे करणे आवश्यक आहे़ त्याची गरज व्यक्त होत आहे़

- वास्तववादी विचारसरणी ठेवून आयुष्य जगले पाहीजे़ त्यासाठी शालेय स्तरावर मानसशास्त्र हा विषय शिकवला गेला पाहीजे़ हा विषय माणसाने विचार कसा करायचा हे शिकवते़ माणसाचे सर्व आयुष्य हे केवळ आणि केवळ विचारावर चालते़ नैराश्यातून आपल्याला कौन्सलर बाहेर काढू शकतो, याचा प्रचार होणे देखील आवश्यक आहे़
- प्रा़ वैशाली पाटील,  मानसशास्त्र तज्ञ

Web Title: Parents, pay attention to the 'warning signal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे