‘मध्यस्थ’ उपक्रमाचा पक्षकारांनी फायदा घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:07 PM2019-07-01T23:07:29+5:302019-07-01T23:07:49+5:30
न्यायाधीश एजाज सैय्यद : कौटुंबीक न्यायालय प्रसंगी प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पती-पत्नीतील भांडण कित्येकदा किरकोळ स्वरूपाचे असते. दोघांमध्ये ताटातूट झाल्यानंतर आणखी समज गैरसमज वाढलेले असतात़ त्यांच्यातील भांडण गुंतागुंतीचे व भावनिक असते. सदर प्रकरण मध्यस्थाकडे गेल्यानंतर मध्यस्थाने दोघांचे गाºहाणे ऐकून घेतल्यानंतर समस्या नेमकी काय आहे, हे लक्षात येते़ त्यातून पती-पत्नीमधील वाद संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयातील मध्यस्थ उपक्रमाचा पक्षकारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एजाज सैय्यद यांनी केले.
कौटुंबिक न्यायालयात पार पडलेल्या मध्यस्थ जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश सैय्यद बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश व्हि. बी. पाठक हे होते. कौटुंबिक न्यायालय व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विदयमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश पाठक यांनी मध्यस्थ या संकल्पनेचा उगम कसा झाला, त्यासंबंधी कायद्यातील तरतुदीची माहिती दिली. धुळे जिल्हा वकील संघाचे माजी उपाध्यक्ष अॅड़ जितेंद्र निळे यांनी मध्यस्थ उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड़ संजय भट यांनी केले़ तर सुत्रसंचालन अॅड़ मालविका पासेकर यांनी केले़ आभार अॅड़ विनोद बोरसे यांनी मानले़
कौटुंबीक न्यायालयाचे समुपदेशक अनुराधा खरात, अॅड़ प्रभावती माळी, अॅड़ इंदिरा मोरे, अॅड़ सुधा जैन, अॅड़ मनिषा मराठे, अॅड़ सुनील जैन, अॅड़ दीपक जोशी, अॅड़ महेश देवळे, अॅड़ संदिप सराफ, अॅड़ शिरीष वैद्य, अॅड़ अनिल पाठक, अॅड़ नरेंद्र अहिरराव, अॅड़ विश्वनाथ अमुतकर यांच्यासह बहुसंख्य पक्षकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.