सहाशे प्रतिनिधींचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 10:06 PM2019-09-22T22:06:59+5:302019-09-22T22:07:42+5:30
नाडी दर्पण : एकदिवसीय कार्यशाळेला देशभरातून प्रतिसाद
धुळे : कमलाबाई अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयातर्फे नाडी परीक्षणावर रविवारी आयोजित नाडीदर्पण राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातून ६०० प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
शहरातील दाते एजन्सी येथे रविवारी या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानावरून जळगाव येथील प्रसिध्द आयुर्वेद तज्ञ डॉ़ जयंत जहागीरदार यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले़़ कार्यशाळेत जागतिक किर्तीचे नाडीतज्ञ डॉ़संजय छात्रे यांनी देशभरातून आलेल्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले़ परिषदेचे उदघाटन जिल्हा आरोग्यधिकारी डॉ़शिवचंद्र सांगळे यांच्याहस्ते झाले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ़ संजय संघवी, डॉ़ प्रविण जोशी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ़ अमित कंढेवार, डॉ़ ज्योती बोरकर, अनिल पाटील उपस्थित होते़ कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले़