पटेल आणि कदमबांडे यांच्याकडे दुसºया दिवशीही तपासणी सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:34 PM2018-01-18T12:34:15+5:302018-01-18T12:35:38+5:30
आयकरचे पथक तळ ठोकून : निवासस्थानी प्रवेशाला मनाई कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : माजी मंत्री व विद्यमान विधान परिषदेचे सदस्य अमरिशभाई पटेल आणि जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह १० जणांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळपासून सुरु असलेली आयकर विभागाची तपासणी दुसºया दिवशी गुरुवारीही सुरु होती. रात्री पथकाचे काही अधिकारी निवासस्थानीच थांबले तर काही हॉटेलमध्ये मुक्कामी राहिले.
नाशिक व मुंबई येथून सुमारे १५० ते २०० अधिकाºयांचे पथक बुधवारी सकाळपासून धुळे आणि शिरपूरमध्ये दाखल झाले आहे. अधिकाºयांच्या पथकांनी डिसान उद्योग समुहाचे भागिदारांच्या निवासस्थानी आणि धुळे एमआयडीसी आणि शिरपूर येथील तोंदे आणि दहिवद शिवारातील समुहाच्या सुरु असलेल्या उद्योगाच्या ठिकाणी एकाचवेळी तपासणीला सुरुवात केली आहे. बुधवारी दिवसभरात अधिकाºयांनी उद्योगाचे कार्यालय आणि निवासस्थानावरील संगणक आणि महत्वाच्या फाईलीची तपासणी केली. याशिवाय उद्योग समुहाच्या बँकेतील खात्यांचीही तपासणी करण्यात आल्याचे समजते़ उद्योग समुहातील उत्पादनाचे कामकाज हे नियमित सुरु असून कामगारांना तपासणी केल्यानंतर बाहेर सोडण्यात आले. परंतु, कार्यालयात काम करणाºया कर्मचारी आणि अधिकाºयांना मात्र बाहेर जाऊ दिले नाही़ रात्रीही हे अधिकारी व कर्मचारी कार्यालयातच थांबून होते.
रात्री मुक्काम - तपासणीदरम्यान बुधवारी रात्री पथकातील काही अधिकाºयांनी निवासस्थानी तर काहींनी शहरातील बुक केलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता.
दुसºया दिवशी सकाळपासून पुन्हा तपासणीला सुरुवात - गुरुवारी सकाळपासून पुन्हा पथकाच्या अधिकाºयांनी तपासणीला सुरुवात केली आहे. दुसºया दिवशीही निवासस्थानी आणि कार्यालयामध्ये सर्वांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. तपासणी दरम्यान आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती त्याठिकाणी उपस्थित कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून घेतली जात आहे. गुरुवारी सुद्धा पथकाच्या कोणत्याही अधिकाºयांनी तपासणीबद्दल माहिती दिलेली नाही.