पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्याची गाडी जाळली
By admin | Published: February 6, 2017 12:20 AM2017-02-06T00:20:43+5:302017-02-06T00:20:43+5:30
शिरपूर शहरातील शास्त्रीनगरात मध्यरात्रीची घटना
शिरपूर : शहरातील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली कार शनिवारी मध्यरात्री 12.45 वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी जाळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अज्ञात आरोपीविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 14 वर्षापासून प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील हे शास्त्रीनगर मधील प्लॉट क्रमांक 35 येथे राहत आहेत. त्यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीलगत त्यांची कार (एमएच 18- एजे 5661) नेहमीप्रमाणे लावली होती़ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. पेटत्या गाडीतून मोठा आवाज झाल्याने डॉ़ पाटील यांच्या मुलीच्या लक्षात आले. तिने घरातील लोकांना सांगितल़े तसेच गाडी पेटत असल्याचे जवळील लोकांना सांगितल्यानंतर त्यांनी पाणी टाकून कार विझविण्याचा प्रय} केला.
15 मिनिटात पोलीस घटनास्थळी
ही कार जळण्यापूर्वी पोलिसांची गस्त शास्त्रीनगरजवळील एका कॉलनीत होती. त्यांना कार जळाल्याची माहिती मिळताच, अवघ्या 15 मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा कारच्या बाजूलाच पेट्रोलची रिकामी बाटली आढळून आली. ती बाटली पोलिसांनी ताब्यात घेतली आह़े
कारचे इंजीन खाक; 4 लाखांचे नुकसान
आर.सी. पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेत प्राचार्य डॉ. पाटील यांचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण कारचे इंजीन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. याबाबत प्राचार्य डॉ़ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम 435 प्रमाणे शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.